February 27, 2026

शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन

  • आष्टा– ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने विद्यामंदिर हायस्कूल,आष्टा येथे संस्थापक अध्यक्ष कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.कार्यक्रम मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.
    कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या मराठी विषयाच्या शिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे यांच्या हस्ते कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व पूजन करून करण्यात आली.यावेळी उपस्थितांनी गुरुजींच्या शैक्षणिक,सामाजिक व संस्कारक्षम कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
    मुख्याध्यापक आनंद रामटेके यांनी आपल्या मनोगतात संस्थापक अध्यक्षांनी रुजविलेल्या शैक्षणिक मूल्यांची परंपरा जपण्याचे आवाहन केले. “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करणे,हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असे त्यांनी सांगितले. यावेळी जेष्ठ शिक्षक नामदेव अनंत्रे,शिक्षक संघपाल सोनकांबळे, सुजीतकुमार जाधव तसेच विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण कृतज्ञता, प्रेरणा आणि आदरभावाने भारावलेले होते.संस्थापकांच्या स्मृतींना उजाळा देत विद्यालयाने त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
error: Content is protected !!