धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघात दि.२४ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी ६ उमेदवारांनी १२ नामांकन अर्ज दाखल केले.तर ४९ अर्जदारांनी ८३ अर्ज खरेदी केले. २४० – उमरगा विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले.तर १० अर्जदारांनी १९ नामांकन अर्जाची खरेदी केली.२४१ – तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ३ उमेदवारांनी ५ अर्ज दाखल केले. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी एक अर्ज,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी दोन अर्ज आणि बहूजन समाज पार्टीच्या वतीने तांबोळी यांनी एक अर्ज दाखल केला तर ९ इच्छुक उमेदवारांनी २१ अर्ज खरेदी केले. २४२ – उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात बहुजन समाज पार्टीच्या वतीने सुभाष गायकवाड यांनी नामांकन अर्ज दाखल केला.तर २० अर्जदारांनी २६ अर्ज खरेदी केले आणि २४३ -परंडा विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत शिवसेना (शिंदे गट) यांनी दोन अर्ज दाखल केले.अपक्ष योगीराज तांबे आणि नाना मदने यांनी प्रत्येकी एक नामांकन अर्ज दाखल केले. १० व्यक्तींनी १७ अर्ज आज खरेदी केले.
More Stories
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन