कळंब – समाजाच्या विकासात शिक्षणाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे, आणि त्यात बदल घडवायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे सत्य शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी ठामपणे मांडले.बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे,यासाठी त्यांनी अत्यंत त्याग,मेहनत आणि वेळ दिली आहे.त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा संचलित मराठवाडयातील विविध ठिकाणी शाळा,विद्यालये व वसतिगृह चालवून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या भविष्याची दिशा बदलण्याची संधी मिळाली आहे. गुरुजींनी शिक्षणाला सामाजिक बदलाचे प्रमुख साधन मानून शिक्षण क्षेत्रात अविरत सेवा दिली.त्यांनी बहुजन समाजातील मुलांना उत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी कायमच प्रयत्नशील राहून समाजात परिवर्तन घडविण्याचे महान कार्य केले. शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला सामाजिक,आर्थिक, आणि सांस्कृतिक उन्नतीकडे नेण्यासाठी त्यांच्या कार्याने नवा आदर्श निर्माण केला आहे. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी केलेल्या त्यागमय योगदानामुळे बहुजन समाजातील अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रकाशाने उजळले आहेत. त्यांचे कार्य आजही शिक्षणाच्या क्षेत्रात दीपस्तंभासारखे आहे आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. अशा महान व्यक्तीच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला सलाम करून, त्यांच्या योगदानाची आठवण ठेवणे हेच त्यांना खरे आदरांजली आहे. दि.२४ ऑक्टोबर २०२४ वार गुरुवार रोजी कळंब शहरातील शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात गुरुजींच्या पुतळ्यास प्रा.आर.जे.कारकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक डॉ.कमलाकर जाधव सह महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले