धाराशिव ( यशपाल सोनकांबळे ) – कळंब तालुक्यातील सापनाई येथील शेतकरी पुत्र अशोक संजय बाराखोते यांनी २०२३ च्या राज्यसेवा परिक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात ११ व्या क्रमांकाने पास होवून वर्ग १ पदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा व कुटूंबियांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी रविवारी (दि.२९) त्यांच्या घरी जावून सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना संजय पाटील दुधगावर यांनी अशोक बाराखोते हे कोरडवाहू शेतकरी कुटूंबातील असून त्यांना दोन भाउ, दोन बहिणी असा कुटूंब परिवार असून कुटूंबातील सर्वात मोठा अशोक आहे. शेतकरी परिस्थितीशी संघर्ष करत दिवसरात्र अभ्यास करत वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी यश मिळवले,याचा जिल्हाला अभिमान असल्याचे सांगितले. याप्रसंगी सापनाईचे सरपंच अमर डोके,मेजर पायाळे,दहिफळचे माजी उपसरपंच पप्पू भातलवंडे, कृष्णा पाटील,गोपीनाथ मते, राहुल धाबेकर यांच्यासह अशोकचे आई-वडील आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले