August 8, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.29 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 139 कारवाया करुन 1,27,600 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • आंबी पोलीस ठाणे: आरोपी नामे-विठ्ठल शंकर दाभाडे, वय 65 वर्षे, रा.कंडारी ता. परंडा जि. धाराशिव हे दि 29.09.2024 रोजी 11.00 वा. सु. गावातील आपल्या पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 910 ₹ किंमतीच्या 13सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये आंबी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे: आरोपी नामे-लिलाबाई आत्मा पवार, वय 50 वर्षे, रा. दत्तनगर पारधी पिडीढोकी ता. जि. धाराशिव हे दि 29.09.2024 रोजी 15.00 वा. सु. दत्तनगर पारधी पिडी ढोकी येथे अंदाजे 4,000 ₹ किंमतीची 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-सिताबाई शिवाजी काळे, वय 51 वर्षे, रा. कसबे तडवळा ता. जि. धाराशिव या दि 29.09.2024 रोजी 12.20 वा. सु. बाजार पेठ जवळील खंडोबा मंदीर समोरील तलाठी ऑफीसचे समोर अंदाजे 5,600 ₹ किंमतीची गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-हिराचंद काकासाहेब सलकर, वय 28 वर्षे, रा. भंडारवाडी ता. जि. धाराशिव हे दि 29.09.2024 रोजी 16.10 वा. सु. भंडारवाडी पाटी जवळ आरणी रोडलगत अंदाजे 5,120 ₹ किंमतीची गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये ढोकी पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.
  • वाशी पोलीस ठाणे: आरोपी नामे-विलास देवराव काळे, वय 40 वर्षे, रा.सरमकुंडी ता. वाशी जि. धाराशिव हे दि 29.09.2024 रोजी 18.50 वा. सु. सरमकुंडी ते भुम जाणारे रोडवर सरमकुंडी येथे डाव्या बाजूस पत्र्याचे शेडमध्ये अंदाजे 16,550 ₹ किंमतीची गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला .
  • मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • कळंब पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- अभय त्रिंबकराव मनगिरे, वय 49 वर्षे, रा. देवी रोड कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांचे कळंब ते ढोकी जाणारे रोडवरील पिंपळगाव डोळा शिवारातील शेत गट नं 51 मधील 35 लोखंडी ॲगल अंदाजे 15,000₹ किंमतीचे हे दि.27.09.2024 रोजी 15.00 ते दि. 28.09.2024 रोजी 10.00 वा. सु.अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अभय मनगिरे यांनी दि.29.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-रवि उर्फ बाळु गहिनीनाथ चव्हाण,प्रशांत उर्फ गोटु गहिनीनाथ चव्हाण,सतिश बाबुराव चव्हाण, वैभव गोविंदराव सांळुके, सदाशिव सांळुके सर्व रा. मुळज ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 27.09.2024 रोजी 21.45 वा. सु. संभाजी चौक मुळज येथे फिर्यादी नामे-अमर गुलाबराव वरवटे, वय 43 वर्षे, रा. काळे प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अमर वरवटे यांनी दि.29.09.2024 रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 109, 189( 2), 191(2), 191(3), 190, 115(2), 352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-बालाजी ढाकणे, गयाबाई मंचीक ढाकणे, मंचीक सोपान ढाकणे, सारिका बाजीराव ढाकणे, सोनाजी बाजीराव ढाकणे, बाजीराव ढाकणे सर्व रा. पारा ता. वाशी जि.धाराशिव यांनी दि.28.09.2024 रोजी 17.00 वा. सु. पारा शिवारातील शेत गट नं 316 मध्ये फिर्यादी नामे-सर्जेराव निवृत्ती ढाकणे, वय 50 वर्षे, रा. पारा ता.वाशी जि. धाराशिव यांना व त्यांचा मुलगा दिलीप व पत्नी यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून बैल व कुळव शेतात येण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाबुकाची लोखंडी विळत, औताचे रुमने व दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सर्जेराव ढाकणे यांनी दि.29.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 189(2), 191(2), 191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • शिराढोण पोलीस ठाणे :आरोपी नामे-बालाजी महादेव शेळके, सुदर्शन बालाजी शेळके,हानुमंत बालाजी शेळके,कानुपात्रा बालाजी शेळके सर्व रा. खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.27.09.2024 रोजी 07.30 वा. सु. खामसवाडी येथे फिर्यादी नामे-शितल रमेश उगले, वय 48 वर्षे, रा. खामसवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पावसाचे पाणी घराकडील रस्त्यावर सोडल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादीचे पती व मुले हे भाडंण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शितल उगले यांनी दि.29.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे:मयत नामे- बाळासाहेब अशोक सुरवसे, रा. वडगाव काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांने दि.20.10.2023 रोजी 10.00 वा.सु. वडगाव काटी शिवारातील शेत गट नं 235 मधील लिंबाचे झाडास गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- सुवर्णा बाळासाहेब सुरवसे,(पत्नी), कृष्णाथ उर्फ आबा रामलिंग म्हमाने दोघे रा. वडगाव काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी मागील काही दिवसांपासून मयत बाळासाहेब यास कौटुंबिक वादाचे कारणावरुन भाडंण तक्रारी करुन मारहाण केल्याने. त्यांचे त्रासास कटाळूंन बाळासाहेब यांने गळफास घेवून आत्महात्या केली. आकस्मात मृत्युचे चौकशी वरुन फिर्यादी नामे- महादेव अशोक सुरवसे, वय 40 वर्षे, रा. वडगाव काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.29.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं. वि.सं.कलम-306, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ लैंगीक अत्याचार.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :एका गावातील एक 22 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय)दि. 27.09.2024 रोजी 14.30 वा.सु. ही घरी एकटी असताना गावातील एका तरुणाने तिचे घरी येवून तु मला आवडतेस मला तुझ्या सोबत लग्न करायचे आहे त्यावर नमुद मुलीने विरोध केल्याने सदर तरुणाने तिस मारहाण करुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन पिडीतेची बहिण यांनी दि. 29.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम- 64(1), 64(2) (के), 75(1), 115(2), 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!