कळंब- ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या प्रेरणेने शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, कळंब येथील समाजशास्त्र विभाग,अंतर्गत तक्रार निवारण समिती व महिला व बालविकास विभागाच्या सखी वन स्टॉप सेंटर, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती अभियान हा कार्यक्रम महाविद्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाची संकल्पना- “ समानतेकडे एक पाऊल– सुरक्षित समाजाकडे वाटचाल या कार्यक्रमासाठी ॲड.प्रियंका जाधव,केंद्र प्रशासक,महिला व बालविकास विभाग,या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपले विचार व्यक्त करताना हुंडा प्रथा,कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या सामाजिक समस्यांचे गंभीर परिणाम या विषयावर मंथन केले.महिलांसाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर तरतुदी,सखी वन स्टॉप सेंटरमार्फत मिळणारी मदत, समुपदेशन व संरक्षण सेवा याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.तसेच याप्रसंगी श्रीमती. अर्चना मुळीक केस वर्कर,सखी वन स्टॉप सेंटर धाराशिव व सोहन पेठे सहायक कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. हेमंत भगवान,उपप्राचार्य डॉ. कमलाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली.व्याख्याते डॉ. दादाराव गुंडरे यांनीही आपल्या मनोगतातून महिलांच्या सन्मानासाठी व सुरक्षिततेसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे अधोरेखित केले.तसेच भारतीय राज्यघटना आणि समाजसुधारकांचे प्रयत्न यामुळे महिला सबलीकरणाचा पाया खंबीर झाला,असे प्रतिपादन केले. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक ज्ञान वाढण्यासोबतच महिलांविषयी आदर,समानता आणि सुरक्षिततेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मोठी मदत झाली. कार्यक्रमाचे आयोजन समाजशास्त्र विभाग व अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने करण्यात आले. प्रस्तुत कार्यक्रमात महाविद्यालयातील प्रा.डॉ.चिंते,डॉ. सूर्यवंशी,डॉ.अदाटे, प्रा.अंकुशराव, डॉ.ताटीपामुल,डॉ.फाटक,डॉ. पावडे,डॉ.म्हस्के,प्रा.दळवी,डॉ. वाघमारे,प्रा.शिंदे,प्रा.शिंपले,प्रा. तांबोळी,प्रा.जमाले,प्रा.पालके तसेच अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या सदस्या प्रा.अर्चना पाटील,प्रा.प्रणिता खोसे,डॉ. रोहिणी लोह्करे,प्रा.ज्योती उन्हाळे सुनंदा झांबरे,राजश्री भारती, कल्पना मडके,जया पांचाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. ईश्वर राठोड,डॉ.मीनाक्षी जाधव, प्रा. अर्चना मुखेडकर,प्रा.शाहरुख शेख यांनी केले.प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.ईश्वर राठोड यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.शाहरुख शेख तर आभार डॉ.समाधान चंदनशिवे यांनी केले.प्रस्तुत कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रबंधक हनुमंत जाधव व अरविंद शिंदे यांनी सहकार्य केले तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक विषयांवरील आपली जागरूकता दर्शवली.
More Stories
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
कळंब बाजार समितीत चोऱ्यांचा सुळसुळाट