धाराशिव (जिमाका) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाकडून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता एनएसएफडीसी योजनेअंतर्गत सुविधा कर्ज योजना रक्कम ५ लाख रुपये,महिला समृध्दी योजना रक्कम १ लक्ष ४० हजार रुपये कर्ज योजनेचे कर्ज प्रस्ताव ऑनलाईन/ऑफलाईन महामंडळाच्या वेबसाईट प्रणालीव्दारे मागविण्यात आले होते.या योजनेतील अर्जदारांची चिटटी लॉटरी पध्दतीने उपजिल्हाधिकारी,धाराशिव यांचे अध्यक्षतेखाली निवड करण्याकरिता ४ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सांस्कृतिक सभागृह,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत जवळ,धाराशिव,येथे चिटटी / लॉटरी पध्दतीने अर्जदारांची निवड करण्याची प्रक्रिया होणार आहे.तरी ज्या अर्जदारांनी ऑनलाईन केलेले व ऑफलाईन अर्ज जमा केलेले आहेत.अशा अर्जदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) धाराशिवचे जिल्हा व्यवस्थापक लक्ष्मण क्षीरसागर यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला