मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय १९ वर्षीय वयोगटातील गोळा फेक क्रीडा प्रकारामध्ये मोहा येथील ज्ञान प्रसार विद्यालयाचा विद्यार्थी कु.सोहन साळुंके तालुक्यातून सर्व प्रथम तर जगन्नाथ माळी हा विद्यार्थी तालुक्यातून सर्व द्वितीय आला आहे.त्याचबरोबर वयोगट १७ मधून तालुक्यातून दुसरा कु.अभिजीत जाधव हा आला असून 200 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात 19 वर्षीय वयोगटात कु.रोहन जाधव तालुक्यातून तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले. तर 400 मीटर धावने या क्रीडा प्रकारात 19 वर्षीय वयोगटातील कु. जगन्नाथ माळी हा विद्यार्थी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावत यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,मुख्याध्यापक संजय जगताप यांनी तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
More Stories
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसारच्या वतीने अभिवादन
बदलत्या शैक्षणिक युगात शिक्षकांची भूमिका व्यापक झाली – डॉ.अशोकराव मोहेकर
ज्ञान प्रसार विद्यालयात उत्साहात शिक्षक-पालक सभा संपन्न