आष्टा – पुरोगामी महाराष्ट्रात संत नामदेवांच्या उक्तीप्रमाणे “ज्ञान दीप लावू जगी” ह्या उक्तीस प्रमाणभूत मानून व बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची कास धरत निजाम कालीन काळात दळण वळणाची कसलीही साधने नसताना देखील शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करून ग्रामीण भागातील शेतकरी,कष्टकरी,मजूर,दिन दलितांच्या,बहुजनांच्या मुला-मुलींसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारे आदरणीय शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी १९५१ साली कळंब तालुक्यातील मोहा ह्या गावी शिक्षणाचे रोपटे लावले. त्यानंतर पूज्य गुरुजींनी ज्ञान प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मराठवाड्यात विविध ठिकाणी प्राथमिक शाळा,माध्यमिक,उच्च माध्यमिक विद्यालय,वरीष्ठ महाविद्यालय,वसतिगृह स्थापना करून दर्जेदार शिक्षण देवून समाजहितासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. आदरणीय शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस दि.१९ सप्टेंबर २०२४ रोजी वार गुरुवारी भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,अविनाश घोडके,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदींनी अभिवादन केले.
ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने कळंब तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातही शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक संजय जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी प्रा.राहुल भिसे,प्रा.शेखर गिरी,टोपे सह विद्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
विद्यामंदिर हायस्कूलमध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर (अण्णा) यांना अभिवादन
विद्यामंदिर हायस्कूलमध्ये नुतन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर (अण्णा) यांना अभिवादन