June 22, 2025

विद्यामंदिर हायस्कुलात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कुल येथे दि.१७ सप्टेंबर २०२४ रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
    यावेळी स्वातंत्र्य सैनिक गोविंदराव श्राफ यांच्या प्रतिमेस सुभेदार प्रमोद चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन ध्वजारोहण करण्यात आले.
    यावेळी विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद रामटेके यांनी विद्यार्थ्यांना मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वातंत्र्य सैनिकांनी केलेले योगदान सांगितले.
    यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत काकडे,बाबुराव लोखंडेसह गावातील प्रतिष्ठित नागरिक,सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!