August 8, 2025

ज्ञान प्रसार विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली
    शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या ३३ व्या पुण्यतिथीनिमित्त मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुजींना अभिवादन करण्यात आले.
    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील हे होते.
    याप्रसंगी शालेय समिती सदस्य गौतमराव मडके,समाजसेवक पांडुरंग मडके,शालेय समिती सदस्य शशिकांत कसबे,संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेचे बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
    यामध्ये पाचवी ते सातवी गट प्रथम क्रमांकावर भोरे राजश्री अशोक,द्वितीय मडके अदिती अमोल तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मडके मयुरी अमोल या विद्यार्थिनीला मिळाले. इयत्ता आठवी ते दहावीच्या गटात अंकिता महादेव मडके या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय प्रिया शुक्राचार्य भोंडवे व तृतीय (विभागून) अनुष्का रमेश मडके व श्रावणी विनोद वीर या बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. त्यानंतर मोहेकर गुरुजींच्या जीवन व कार्याविषयी अतिशय मुद्देसूद व प्रेरणादायी विचार प्राचार्य संजय जगताप यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नवनाथ करंजकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा.शेखर गिरी यांनी केले.
    शेवटी आभार प्रदर्शन सहशिक्षक सतीश मडके यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!