मोहा–ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय, मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. दि.२९ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी आयोजित या कार्यक्रमात मुख्याध्यापक अविनाश मोरे तसेच प्रशालेचे पर्यवेक्षक सतीश कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिमा पूजन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा संस्थेचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब (आबा) पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे,श्रीमती उषा पांचाळ, ज्ञानोबा टोपे,धनंजय परजने यांच्यासह शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमातून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांनी शिक्षण क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानास कृतज्ञतापूर्वक स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
More Stories
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसार विद्यालयात भावपूर्ण अभिवादन
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मडके यांचा साक्षी पावन ज्योतच्या वतीने सन्मान