मोहा – येरमाळा येथील ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २२ जानेवारी २०२६, गुरुवार रोजी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ सहशिक्षक राजाभाऊ चिलवंत यांच्या हस्ते कै.मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुरुजींच्या शैक्षणिक, सामाजिक व मूल्याधिष्ठित कार्याचा गौरव केला.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी उभारलेली संस्था आज शैक्षणिक क्षेत्रात प्रेरणादायी ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे,पर्यवेक्षक सतीश कानगुडे,उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख सुनील साबळे यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कै.मोहेकर गुरुजींच्या विचारांचा वसा जपण्याचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून समाजघडणीत योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम शांत,सुसंस्कृत व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन