August 8, 2025

ज्ञान प्रसार विद्यालयात पुस्तके वाचनास उत्फुर्त प्रतिसाद

  • मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.२९ ऑगस्ट २०२४ रोजी इ.५वी ते १२ वी मधील विद्यार्थ्यांनी महावाचनात उस्फुर्त सहभाग घेतला.
    यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यालयात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकांचे महावाचन केले तसेच विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाविषयी,लेखकाविषयी ५० ते १०० शब्दात आपले मनोगत आपल्या लेखनातून व्यक्त केले . या प्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप,उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.सुनील साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.या उपक्रमासाठी सहशिक्षक कमलाकर शेवाळे,प्रा. राहुल भिसे,संजय मडके,सतीश मडके,प्रा.रोहित मोहेकर, प्रा. विठ्ठल जाधव, प्रा.अमित जाधव, प्रा.देवदत्त पाटील, प्रा.प्रतिभा सावंत,शहाजी सोलंकर, सहशिक्षिका उषा पांचाळ,नीता सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!