August 8, 2025

गुरुजींच्या स्मृतिदिनानिमित्त गुणवंताचा सत्कार

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे संस्थापक शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या ३३ व्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक ३० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता मोहेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार होणार आहे.
    या कार्यक्रमासाठी संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल लातूरचे संचालक बी.ए.मैंदर्गी अध्यक्ष म्हणून तर प्रमुख पाहुणे शिवाजी महाविद्यालय रेणापूरचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.जयद्रथ जाधव,राजश्री शाहू महाविद्यालय लातूरचे प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे यांची उपस्थिती लाभणार आहे.
    तरी या कार्यक्रमासाठी हजर राहण्याचे आवाहन सचिव डॉ.अशोक मोहेकर,अध्यक्ष डॉ.अनिल मोहेकर, उपाध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल,प्राचार्य सुनिल पवार यांनी केले आहे.
error: Content is protected !!