August 9, 2025

सुशोभिकरणाचे काम त्वरित सुरू करण्याची शिवभक्तांची मागणी

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा व चौक सुशोभीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे हे काम विधानसभा निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी सुरू करावे अशी मागणी शिवभक्त अॕड. मनोज चोंदे यांनी केली आहे.
    कळंब शहरात प्रतिवर्षी शिवजयंती महोत्सव मोठ्या थाटात व भव्य स्वरूपात साजरा केला जातो.आसपासच्या जिल्ह्यातून तसेच राज्यातून शिवभक्त जयंती महोत्सवात सहभागी होण्यासाठी येत असतात. यामुळे १९ फेब्रुवारी शिवजयंती पूर्वी पुतळ्याचे सुशोभीकरण काम पूर्ण करावे अशी शिवभक्तांची इच्छा आहे. शिवभक्तांनी दिनांक २५ जून रोजी नगरपरिषद मुख्याधिकारी कळंब यांच्याकडे निवेदनाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रंगाचे टवके पडत असून यामुळे पुतळ्याची झीज होत आहे यासाठी पुतळ्यास रंगरंगोटी करावी अशी मागणी केली होती व आंदोलनाचा इशारा दिला होता. या अनुषंगाने कळंब नगर परिषद मुख्याधिकारी राजीव तापडिया यांनी अँड.मनोज चोंदे यांना २७ जुलै रोजी पत्र दिले असून या पत्रात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व चौक सुशोभीकरणाचे काम सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांच्या मार्फत हाती घेण्यात येत असल्याचे पत्र नगरपरिषद कार्यालयास संबंधित कार्यालयाकडून दिनांक १४ मे २०२४ रोजी मिळाले आहे.या कामी नगरपरिषदेने ७ जून रोजी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे यामुळे सुशोभीकरणाचे काम सुरू असताना रंगरंगोटी केल्यास रंग धूळ इतर कारणाने सुशोभीकरण कामात त्याचा परिणाम होईल सदरील सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर अथवा या कामास काही कारणाने उशीर झाला तर नगरपरिषद पुतळा रंगरंगोटी करण्याचे काम हाती घेईल असे नमूद केले आहे या संदर्भात सुशोभीकरणाचे काम तात्काळ सुरू करण्या विषयी सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग कळंब यांना कळंब नगरपरिषदेने पत्र दिले आहे
  • @ पूर्वीच्या इस्टिमेट मध्ये इलेक्ट्रिक शिडी चा समावेश नसेल तर तो करावा जेणेकरून छत्रपती शिवरायांच्या जयंती दिवशी व इतर वेळी शिवरायांना अभिषेक करणे व पुष्पहार घालने शिवभक्तांना सोयीचे होईल सध्या जीव धोक्यात घालून शिवभक्त छत्रपती शिवरायांना अभिषेक व पुष्पहार घालत असतात.
    — शिवभक्त अँड.मनोज चोंदे
error: Content is protected !!