धाराशिव – कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील मागासवर्गीय समाजाचे राजकुमार तूपसौंदरे व काही ग्रामस्थ दि.२९ जुलै २०२४ पासून पुढील मागण्यांच्या कार्यवाहीसाठी धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. शासकीय गट नंबर २९१ मधील मागासवर्गीय स्मशानभूमीच्या जागेतील शासकीय व खाजगी अतिक्रमण काढून संरक्षक भिंत बांधणे व समशानभूमीच्या जागेवर अतिक्रमण आहे हे फोटो, अर्ज करून संबंधितना निदर्शनास आणून देखील त्यांना पाठिंबा देणाऱ्या व अतिक्रमण करणाऱ्या संबंधितावर नियमानुसार उचित कार्यवाही करावी,शासकीय गट नंबर २९१ मोजून त्यामधून मधून दफनभूमी व शेतीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कायमस्वरूपी हद्दी खुणा करून रस्ता तांत्रिकदृष्ट्या योग्य करणे व गटाच्या हद्दीवर झाडे लावणे, शासकीय गट नंबर २९१ मधील २०११-१२ मध्ये भ्रष्टाचारी शासकीय अधिकारी व संबंधितांनी कागदोपत्री केलेल्या रस्त्याची चौकशी करून शासनाला व शेतकऱ्यांना लुटणाऱ्या नराधमांकडून २०२३ पर्यंत रस्ता बंद असल्यामुळे जो शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास झाला त्यांच्याकडून वसूल करणे व ०८/०५/२०२३ रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणकरून स्वखर्चाने तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता केलेल्या पिढीत शेतकऱ्यांना १,५०,०००/ मोबदला मिळणे, ०८/०५/२०२३ रोजी उपोषण करून २८/०६/२०२४ पर्यंत पाठपुरावा करून लेखी व तोंडी विनंती व अर्ज करून जनतेच्या टॅक्स मधून फुकट पगार घेणाऱ्या, वर्षभर झोपलेल्या अधिकाऱ्यांची व संबंधितांची दप्तर दिरंगाई कायद्यानुसार गुन्हा दाखल करून उपोषणाला बसण्यास प्रवृत्त केल्यामुळे संबंधित दोशी अधिकाऱ्यांना निलंबित करणे
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला