कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मोहेकर उद्योग समूहाचे अध्यक्ष, चेअरमन हनुमंत मडके यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को-ऑप.क्रे.सोसायटी लिमिटेड मोहा शाखा कळंब येथे दिनांक २७ जुलै २०२४ रोजी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कळंब शाखा अधिकारी फुलचंद मडके यांनी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी अण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन केले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मल्टीस्टेटचे कर्मचारी राहुल मडके,योगेश मुळे, सोमनाथ कातमांडे,तुषार साठे, अनिकेत मडके,विशाल निपाणीकर,श्रद्धा जोशी आदींची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले