कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या ९७ व्या जयंतीनिमित्त दि.२७ जुलै २०२४ रोजी सकाळी ९ वाजता शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या प्रागणात गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी परखड आणि निर्भिड मत व्यक्त करणारे अधिस्वीकृती धारक संपादक सुभाष द.घोडके यांच्या लेखणीतून परिपूर्ण साकारलेले सा.साक्षी पावनज्योतच्या मोहेकर गुरुजी जयंती विशेषांकाचे प्रकाशन ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोक मोहेकर,ह.भ.प महादेव अडसूळ महाराज,संचालक अंकुश पाटील,डॉ.डी.एस.जाधव,प्राचार्य डॉ.सुनिल पवार,उपप्राचार्य हेमंत भगवान,संपादक सुभाष घोडके, उपसंपादक माधवसिंग राजपूत, उपसंपादक अरविंद शिंदे,कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांच्या सह सर्व कर्मचाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न झाले. प्रकाशनाच्या सुरुवातीला गुरुजींच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यंदा मात्र साप्ताहिक साक्षी पावनज्योत परिवारासह मोहेकर कुटुंबीयांच्या आनंदावर दुःखाचे सावट गोंगावत आहे. कारण ज्या माऊलीने पावलो-पावली गुरुजींना आयुष्यभर खंबीर साथ दिली.त्या गुरुजींच्या अर्धांगिनी सुमन आई चे दिनांक २५ जानेवारी २०२४ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.३० ऑगस्ट १९९१ रोजी गुरुजींच्या निधनानंतर संस्थेची धुरा चि. डॉ.अशोकदादांच्या खांद्यावर आली आणि मग मात्र अशा कठीण प्रसंगी स्वतःस सावरत ३३ वर्ष मौलिक मार्गदर्शन आणि खंबीर असणारा आधारवड आईसाहेबांच्या निधनामुळे नाहीसा झाला. सा.साक्षी पावनज्योत मधून गुरुजींच्या जन्माचे स्वागत करून त्यांना विनम्र अभिवादन आणि गुरुजींचे कार्य त्यांची शैक्षणिक तळमळ,त्याग आणि शैक्षणिक प्रचार आणि प्रसार तरुण पिढीला माहीत करून देणे गरजेचे आहे. मरावे परी कीर्ती रुपे उरावे या पंक्तीस प्रमाणभूत मानून, सामाजिक बांधिलकी जोपासत असताना प्रत्येकाच्या जीवनात काटेरी प्रवास असतोच! परंतु ज्या व्यक्तीने आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शैक्षणिक,सामाजिक हित जोपासले त्या व्यक्तीचे कार्य कर्तृत्व चिरंतर राहते.याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी होत. पुरोगामी महाराष्ट्रात संतांच्या व बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची कास धरत ग्रामीण भागात दळण वळणाची कसलीही साधने नसताना देखील शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करून ग्रामीण भागातील शेतकरी,कष्टकरी, मजूर,दिन दलितांच्या, बहुजनांच्या मुला- मुलींसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारे मोहेकर गुरुजी ! शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींचा जन्म दिनांक २७ जुलै १९२७ रोजी त्रिवेणीबाई भाऊराव मडके यांच्या पोटी आजोळी बीड जिल्ह्यातल्या दहीटणे या गावी झाला.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहा या गावचे शेतकरी मडके दापत्यांच्या पोटी ज्ञानाचा दिवा जन्मला.ज्ञानदेव या नावाला साजेसं असंच ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी कार्य केले. हे आपणा सर्वांना माहित आहे.परंतु नवीन पिढीला ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी केलेले कार्य माहित व्हावे व त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून सा.साक्षी पावनज्योतचा गुरुजींच्या प्रत्येक वर्षी जयंती व पुण्यस्मरण विशेषांक प्रकाशित करण्यात येतो. कारण गुरुजींनी दिलेले शैक्षणिक योगदान पिढ्यांनं पिढ्यां न संपणारे आणि चिरंतर आहे. गुरुजींनी शैक्षणिक कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी १९७१ ला पावन ज्योत नावाचे वर्तमानपत्र सुरू केले होते. गुरुजी हैद्रराबादला जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हाही विद्यार्थी दशेत असताना सुद्धा हॉस्टेलमध्ये राहून हस्तलिखित बोंबाबोंब नावाचे साप्ताहिक काढले होते.कामाच्या व्यापामध्ये पावनज्योतचे सातत्य टिकवता आले नाही.पण त्यांची वर्तमानपत्राची खंत भरून करण्यासाठी अर्थात गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी १५ ऑगस्ट २०१६ ला डॉ.अशोक (दादा) मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सा.साक्षी पावनज्योत धूम धडाक्यात व नव्या जोमाने पुन्हा सुरू करण्यात आले आहे. अशा या त्यागी,तपस्वी असणाऱ्या शिक्षण महर्षीचे पत्रकारितेचे अर्धवट राहीलेले कार्य साक्षी पावनज्योत या साप्ताहिकामुळे पूर्णत्वास जात आहे. सा.साक्षी पावनज्योत नियमित व अखंडपणे तेवत ठेवण्यासाठी वार्षिक वर्गणी ३०० रुपये,आजिवण वर्गणी ५००० रुपये व जाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले