August 8, 2025

उच्च व तंत्र शिक्षणात मुलींच्या शिक्षणाची टक्केवारी वाढणार – कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील

  • लातूर – आज उच्च व तंत्र शिक्षणात शिकणाऱ्या मुलींची टक्केवारी ही ३६ टक्के असून मुलांची टक्केवारी ६४ टक्के आहे. मुलींचे प्रमाण ३६ टक्क्यावरून हे प्रमाण ५० टक्क्याच्यावर नेण्याचा प्रयत्न केला जाईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
    विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालय, उच्च शिक्षण, नांदेड विभाग, नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि महात्मा बसवेश्वर वरिष्ठ महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ जुलै २०२४ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत शिष्यवृत्ती योजना संबंधी संस्था पदाधिकारी, प्राचार्य, शाखा समन्वयक, विभाग प्रमुख, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा ऑनलाइन वेबीनार आयोजित करण्यात आला होता यामध्ये ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. विचार मंचावर संचालक विनोद मोहितकर, प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आणि संचालक शैलेन्द्र देवळानकर यांची प्रमुख ऊपस्थिती होती.
    पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, शासन निर्णयानुसार राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ई डब्ल्यू एस), सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (एस ई बी सी) तसेच इतर मागासवर्ग (ओबीसी) या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या ५० टक्के ऐवजी १०० टक्के लाभ मंजूर करणे बाबतचा निर्णय झाला असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समर्पक आणि विश्लेषणात्मक माहिती दिली यामुळे विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.
    यावेळी मंत्री अतुल सावे यांनीहि विदहयार्थ्याना ऑनलाइन मार्गदर्शन केले.
    महाविद्यालयातील या कार्यक्रमाचा समारोप करताना प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी महाराष्ट्र सरकार, कॅबिनेट मंत्री, संचालक आणि इतर सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून या निर्णयाचा लाभ सर्व विदहयार्थ्यानी घ्यावा असे सांगून उपस्थित संस्था पदाधिकारी, प्राचार्य, सर्व शाखा समन्वयक, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी यांचे आभार व्यक्त केले.
    या कार्यक्रमाला संस्था पदाधिकारी, प्राचार्य, सर्व शाखा समन्वयक, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी होते.
error: Content is protected !!