मंगरूळ – गुणवत्तेसोबत विविध उपक्रमातून विद्यार्थी समृद्ध करणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ कळंब-कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळ गुणवत्ता पूर्ण व उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. यामध्ये शिक्षक, प्रत्येक गावकरी पालक, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षणप्रेमी नागरिक,व विद्यार्थी मोलाचा हातभार लावून शाळेचे नाव उज्वल करण्यासाठी सहकार्य करत आहेत. शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत विविध सहशालेय उपक्रम राबविले जात असल्यामुळे शाळेचे नाव जिल्हा भर गाजत आहे. विविध उपक्रमामध्ये पहिलीपासून स्पर्धा परीक्षा तयारी, प्रसंगा नुरूप छोट्या छोट्या नाटिका सादरीकरण, विविध खेळात विभागस्तर विद्यार्थी सहभाग, परिसर भेटीतून परिसर ज्ञान, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, इंग्रजी संवादाचे सादरीकरण, शैक्षणिक सहल, अध्यापनात टीव्ही तसेच डिजिटल बोर्ड चा वापर इत्यादी वैविध्यपूर्ण उपक्रमामुळे पालक वर्गांचा ओढा या शाळेकडे वाढलेला दिसून येत आहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळेचा पट कमी होत असताना गुणवत्तापूर्ण शाळेमुळे मंगरूळ शाळेचा पट जवळपास 300 च्या आसपास आहे. सर्वांच्या योगदानामुळे मंगरूळ शाळा विद्यार्थी समृद्ध शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले