August 8, 2025

शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या जयंतीनिमित्त विशेषाकांचे प्रकाशन

  • कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या ९७ व्या जयंतीनिमित्त दि.२७ जुलै २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात पुतळ्यास संस्थेचे सचिव डॉ.अशोक मोहेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.अभिवादनानंतर सा.साक्षी पावनज्योतचा जयंती विशेषांक प्रकाशित करण्यात येवून ११.०० वाजता विद्याभवन हायस्कूलच्या मैदानातील गुरुजींच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.
    गुरुजींच्या अर्धांगिणी सुमनआई मोहेकर यांचे २५ जानेवारी २०२४ रोजी निधन झाले असल्याने गुरुजींच्या जयंतीनिमित्त होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
error: Content is protected !!