लातूर/धाराशिव – माघ पौर्णिमेच्या निमित्ताने लातूर-उमरगा-धाराशिव केंद्रातील धम्मचारी,धम्ममित्र व सहायकांनी एकत्र येत दि.१ फेब्रुवारी २०२५ रोजी खरोसा लेणी येथे माघ पौर्णिमा उत्सव श्रद्धा व उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमात धम्मचारी कल्याणदस्सी,धम्मचारी ज्ञानपालित,धम्मचारी प्रज्ञाजीत, धम्मचारी धम्मभूषण,धम्मचारी विबोध व धम्मचारी जिनघोष यांनी आदर्शांचे पूजन केले. उत्सवाच्या पहिल्या सत्राची सुरुवात खरोसा लेणीच्या गाभाऱ्यात पूजा,ध्यान व मंत्रपठाने करण्यात आली.अनापाणसती ध्यानसाधनेनंतर मुख्य प्रवचन सत्र झाले.यावेळी धम्मचारी जिनघोष यांनी प्रवचनकार धम्मचारी ज्ञानपालित यांचा समर्पक परिचय करून दिला. प्रवचनात ज्ञानपालित यांनी बौद्ध इतिहास,लेण्यांचे महत्त्व, शिल्पकलेची समृद्ध परंपरा तसेच लेण्या,विहार व चैत्य ही ऐतिहासिक-सांस्कृतिक धरोहर कशी आहे यावर प्रकाश टाकला. तसेच भंते संघरक्षितांची भूमिका आणि या वारशाचे संवर्धन व जतन करण्यासाठी आपली कर्तव्ये याबाबत मार्गदर्शन केले.त्यांच्या ओघवत्या शैलीमुळे प्रवचनाला विशेष रंगत आली. यानंतर उपस्थितांनी स्नेहभोजन घेतले.लेणी दर्शन व वनविहाराचा आनंद घेतल्यानंतर भंते सुमेध यांनी निर्माण केलेल्या विहारास भेट देण्यात आली.तेथे सप्तांग पूजेच्या शेवटच्या सत्राचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचा प्रस्ताव प्रज्ञाजीत यांनी मांडला तर पूजेचे नेतृत्व धम्मचारी कल्याणदस्सी यांनी केले. प्रवास,भोजन,सामूहिक साधना, प्रवचन व पूजा यामुळे सर्वांमध्ये सकारात्मक मानसिक अवस्था निर्माण होऊन हा एकदिवसीय ‘गेट-टुगेदर’ यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात एकूण जवळपास ६५ धम्म अनुयायी सहभागी झाले होते.
More Stories
सिध्देश्वर यात्रा महोत्सवाची गौरवशाली परंपरा वृंध्दिगत करावी – विश्वस्त विक्रम गोजमगुंडे
सरसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी .
लातूर महानगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र.१६ (ड) मधून अपक्ष उमेदवार विनोद श्रीहरी कोल्हे मैदानात