August 9, 2025

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी विनोद बचुटे

  • कळंब (मानसी यादव ) – साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव निमित्त शहरातील इंदिरानगर, दत्तनगर भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद बचुटे यांनी दिली.
  • साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवानिमित्त इंदिरानगर भागात नुकतीच समितीचे मार्गदर्शक रोहित कसबे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.यामध्ये सर्वानुमते अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव चे अध्यक्ष म्हणून विनोद बचुटे यांची निवड करण्यात आली.
    शिवाय या बैठकीमध्ये जयंतीनिमित्त आयोजित विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली,जयंतीनिमित्त इंदिरानगर व दत्तनगर भागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य जसे की बाहेर पेन्सिल वाटप करण्यात येणार असून सहपूजनाचा कार्यक्रम जयंती विषयी आयोजित करण्यात आला आहे. त्याच दिवशी सायंकाळी मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे सांगितले. बैठकीच्या वेळी अजय गाडे सनी कांबळे सुरज गाडे पंकज विद्याघर सिद्धू खैरमोडे गौतम शिरसाठ आधी उत्सवातील सदस्य बैठकीस उपस्थित होते.
error: Content is protected !!