August 8, 2025

नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास काम बंद आंदोलनचा इशारा

  • धाराशिव – धाराशिव नगर परिषदे अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वेळी पेन्शन विक्री करतात एमसीएमआर लागू असून त्याचे लाभ लाभार्थ्यास देणे बंधनकारक आहे. मात्र ते बंद केलेले असून ते पूर्ववत चालू करावे यासह इतर विविध मागण्यासाठी दि.१ ऑगस्ट रोजी कर्मचारी काळ्याफिती लावून काम करतील. मात्र मागण्या मान्य न झाल्यास दि.8 ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवेसह सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगर पंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दि.२४ जुलै रोजी दिला आहे.
    दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नगर परिषदेचे कर्मचारी, कामगार यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे अथवा त्यांचे औषध उपचाराचे (मेडिकल बील) कसलेही बील हे अदा करण्यात येत नाही. दरम्यान, काही कर्मचाऱ्यांची बिले अदा करण्यात आलेली आहेत. तर काही कर्मचाऱ्यांनी अर्ज करून देखील ती देण्यात आलेली नाहीत. त्याचा खुलासा देण्यात यावा. ७ वा वेतन आयोग शासन निर्णय क्र. वेपुर-२०१९/प्र.क्र.८/सेवा -९, दि.२० जून २०२४ प्रमाणे पाचवा हप्ता देणे आवश्यक होते. परंतू काही कर्मचाऱ्यांना चौथा हप्ता देण्यात आला नाही, तो देण्यात यावा. तर जानेवारी २०२२ ते जून २०२४ पर्यंत शासनाचे सहायक अनुदान किती आले व त्याचा विनीयोग कसा केला ? तसेच उपयोगी प्रमाणपत्र सादर केले, त्याच्या प्रती संघटनेस देण्यात याव्यात. तसेच शासनाचे अनुदान जवळपास दरमहा अंदाजे ३.२० कोटी रुपयांच्या आसपास नगर परिषदेकडे येते.
    हे अनुदान कर्मचाऱ्यांचे वेतन व सेवानिवृत्ती कर्मचारी यांचे बिल देण्यासाठी येथे तथापि या गोष्टीची पूर्तता करीत नाहीत. वरील सर्व मुद्द्यांच्या अनुषंगाने अभिलेख यांच्या छायांकित सत्यप्रती सात दिवसाच्या आत देण्यात याव्या तसेच संघटनेने नमूद केलेल्या वरील मागण्या मान्य कराव्यात, या मागण्या मान्य कराव्यात असे नमूद केले आहे. यावर अध्यक्ष दीपक तावरे, सचिव रावसाहेब शिंगाडे, तानाजी सुरवसे दत्तात्रय बनसोडे, कुमार मुंडे, धनराज मिसाळ, सुदाम खरात गायकवाड, दत्ता पेठे, अशोक देवकते, भास्कर वाघ चौरे, लहू गेजगे, दयानंद बनसोडे, एजाज शेख, सुनील उंबरे, अरुण जाधव, नागनाथ गोरपे, सिद्राम जानराव, नितीन गायकवाड, सचिन गायकवाड, जे.एस. राजेनिंबाळकर, दिगंबर डुकरे, शाकीर शेख, अजिंक्य जानराव आदीसह इतर कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत
error: Content is protected !!