February 9, 2026

” असे झुंजलो आम्ही ” पुस्तकासाठी नागरिकांनी माहिती द्यावी; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

  • धाराशिव (जिमाका) – हैदराबाद मुक्तिसंग्रामाबाद जिल्ह्याचे योगदान महत्वपूर्ण आहे.या योगदानाची माहिती जिल्ह्यातील नागरिकांना आणि येणाऱ्या नव्या पिढीला व्हावी यासाठी ” असे झुंजलो आम्ही ” या पुस्तकाच्या भाग -2 चे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे.
    जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा लढला गेला परंतु काही ठिकाणी झालेल्या या लढ्यातील घटनेची माहिती आजपर्यंत पुढे आलेली नाही, ती माहिती जर जुन्या जाणत्या नागरिकांकडे तसेच लेखकांकडे उपलब्ध असेल तर त्यांनी ही माहिती लेखी स्वरुपात जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी संतोष भोर यांचेकडे द्यावी.जेणेकरून त्या माहितीचा समावेश ” असे झुंजलो आम्ही ” भाग -2 या पुस्तकात करता येईल.
  • मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांनी दिलेली निवेदन आणि त्या अनुषंगाने प्राप्त अर्जाच्या अंमलबजावणीसाठी स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर यांनी ” असे झुंजलो आम्ही ” या पुस्तकाचा भाग – 2 चे काम पूर्ण करण्यासाठी प्रभारी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव यांच्या अध्यक्षतेखाली दि. 25 जुलै रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक भास्कर नायगावकर,स्वातंत्र्यसैनिक बुवासाहेब जाधव,उपजिल्हाधिकारी संतोष भोर,प्रा.डॉ.सतीश कदम,सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी कुंटला यांची उपस्थिती होती.
  • ” असे झुंजलो आम्ही ” हे पुस्तक तयार करण्यासाठी नागरिकांकडून आलेली सर्व माहिती एकत्रित करण्यात येणार आहेत.प्रा.डॉ.कदम, स्वातंत्र सैनिक भास्कर नायगावकर,बुवासाहेब जाधव हे पुस्तक तयार करण्यासाठी सहकार्य व मार्गदर्शन करणार असून प्रा डॉ.कदम हे पुस्तक तयार करण्यासाठी विविध संदर्भ प्राप्त करून एक वस्तुनिष्ठ माहिती तयार करणार आहे.
  • तरी जिल्ह्यातील नागरिकांनी व लेखकांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात जिल्ह्याच्या योगदानाची त्यांच्याकडे असलेली माहिती उपलब्ध करून द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
error: Content is protected !!