धाराशिव (जिमाका) – जिल्ह्यात सन 2023 मध्ये पर्जन्यकाळात 89.5 टक्के पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसामुळे कृषी पिकावर विपरीत परिणाम होवुन उन्हाळी हंगामातील कृषि पिकांच्या पेरणीमध्ये घट होण्याची शक्यता आहे.यामुळे राज्यातील पशुधनास जुन ते ऑगस्ट 2024 या कालावधीत आवश्यक चारा उत्पादीत होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अंतर्गत सन 2024-25 या वर्षात जिल्हा वार्षिक योजना दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम) या योजनेअंतर्गत वैरण बियाणे वाटपासाठी जिल्हयासाठी 100 लक्ष रुपये नियतव्यय मंजुर करण्यात आला आहे. जिल्हयामध्ये दुष्काळ जाहीर झालेला असुन जनावरांना चारा उपलब्धतेसाठी व पुढील कालावधीत चारा मिळण्यासाठी सध्या चांगला पाऊस पडत असल्याने व पेरणीची वेळ आल्याने पशुसंवर्धन विभागाकडून दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम ) या योजनेमध्ये निवड करण्यात आलेल्या पशुपालकांना जनावरांच्या चा-यासाठी नियतव्ययामधुन 100 टक्के अनुदानावर जिल्हयातील एकुण 5 हजार 493 पशुपालकांना 35 हजार 840 किलो सुधारीत संकरित मका या वैरण बियाणाचे वाटप करण्यात आले आहे.योजनेमध्ये निवड करण्यात आलेल्या धाराशिव तालुक्यातील पशुपालकांला 14 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते त्यांच्या दालनात सुधारीत संकरित मका या वैरण बियाणाचे वाटप करण्यात आले. या योजनेमधील निवड करण्यात आलेल्या पशुपालकांनी तात्काळ बियाणेची पेरणी करुन जनावरांच्या चा-याचे उत्पादन घेवुन चा-याचा प्रश्न सोडवण्यात यावा.असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त व जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश