लातूर – येथील क्रीडासंकूलमधील बाबासाहेब परांजपे फाऊंडेशनच्या वाचनालयात राजर्षी शाहू महाराज जयंती समितीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती सदस्यांची बैठक संपन्न झाली. यावेळी जयंती समितीचे सचिव प्रा.अर्जून जाधव यांनी मागील बैठकीत झालेली चर्चा आणि त्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय सांगीतले आणि पुढील कार्यक्रमाची दिशा स्पष्ट केली. यावेळी झालेल्या चर्चेत दि. 26 जून 2O24 रोजी सकाळी 8 : वाजता लातूर शहरातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याचे ठरले.तसेच सायंकाळी 6:OO वाजता अंध्दश्रध्दा निर्मूलन समितीने शाहू जयंती निमीत अंजनी हॉटेलच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहाण्याचे ठरले. तसेच 15 जुलै पर्यत सर्व तालूका स्तरावर प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्याचे ठरले. जयंती समितीच्या सर्व सदस्यांनी जयंती कार्यक्रमासाठी किमान 1OOO/ – रुपये प्रा.मकबूल शेख .( फोन पे. नं.9595254686) यांच्याकडे नगदी किंवा ऑनलाईन पाठवावेत असे ठरले. शिवाय समाजातील सुजाण नागरीकांनाही आर्थिक योगदान देण्याचे अवाहन करण्यात आले. तसेच सर्व तालूका स्तरावर आणि ग्रामीण भागात महिनाभर प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्याचे निश्चीत झाले. या बैठकीस प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, प्रा.सुभाष भिंगे, प्राचार्य आर.डी. निटूरकर, प्रा. कॉ. दत्ता सोमवंशी, प्रा.दत्ता सूरवसे, डि.उमाकांत,अँड. वाघमारे, राहूल लोंढे,प्रा.डॉ. अशोक नारनवरे, प्रा.डॉ. निशिकांत वारभवन आदी मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन नरसिंग घोडके यांनी केले.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे