लातूर – श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था,लातूरची मुहूर्तमेळ १९६० च्या कालावधीमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या विचाराला अनुसरून देशीकेंद्र महाराजांनी केली. त्यावेळी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे लावलेले इवलेसे रोपटे आज वटवृक्षाच्या स्वरूपामध्ये आपणास दिसून येत आहे. या संस्थेअंतर्गत शाळा, महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये मिळून एकूण १६ यूनिट्स चालविले जातात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०ला अनुसरून लातूरमध्ये महात्मा बसवेश्वर विद्यापीठ निर्माण करण्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर आपणास सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी ग्राम विकास मंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी केले. लिंगायत शरण फाउंडेशन, (महा.)च्यावतीने श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या नवनिर्वाचित संस्था पदाधिकारी सत्कार सोहळा भालचंद्र ब्लड बँक सभागृहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर शहर महानगरपालिकेचे माजी उप महापौर चंद्रकांत बिराजदार, भाजपा नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्यासह अध्यक्ष आदिनाथ सांगवे, सचिव माधवराव पाटील (टाकळीकर), सहसचिव सुनील मिटकरी, कार्यकारी संचालक प्रदीप दिंडीगावे, संचालक बस्वराज (राजू) येरटे, संचालक काशिनाथ साखरे, संचालक बाबुराव तरगुडे, संचालक गुरुलिंग धाराशीवे आणि संचालक महेश हालगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन उत्तम भूतके यांनी संगीतमय स्वागत गीत सादर केले. पुढे बोलताना बसवराज पाटील मुरूमकर म्हणाले की, संस्था ही समाजाने दिलेली देणगी असते. त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाचा व सेवेचा सातत्याने संस्था पदाधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. नवनिर्वाचित संस्था पदाधिकाऱ्यांना समाजाने दिलेली जबाबदारी त्यांच्या दूरदृष्टी विचारामुळे यशस्वीरित्या पार पाडतील आणि पुढील ५० वर्षात संस्थेला वैभवशाली बनविण्याचा सातत्याने प्रयत्न करतील. नवनिर्वाचित अध्यक्ष आदिनाथ सांगवे आणि नवनिर्वाचित सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांचे कामाचे कौतुक करून सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या. या संस्थेच्या सर्व युनिटद्वारे भविष्यात उज्वल यश प्राप्त करणारी भावी पिढी निर्माण केली जाईल त्यासाठी संस्थेच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे सहकार्याच्या भूमिकेत असल्याचे सांगून लिंगायत शरण फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना अर्चनाताई पाटील चाकूरकर म्हणाल्या की, देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेविषयी एक वेगळी आपुलकी आहे. या संस्थेतील नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी हे चाकूरकर परिवाराचे सदस्य आहेत. आमचे संपूर्ण कुटुंब या संस्थेच्या सोबत आहे. संस्था ही समाजातील प्रत्येकाची असते. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विश्वास आणि अपेक्षा या संस्थेमार्फत पूर्ण केल्या पाहिजे. या संस्थेतील आदिनाथ सांगवे काका, माधवराव पाटील टाकळीकर आणि इतर सर्व संचालक मंडळातील पदाधिकारी सामाजिक भावनेने कार्य करणारी वरिष्ठ मंडळी असल्यामुळे या संस्थेद्वारे गुणवंत व गुणवान विद्यार्थी भविष्यामध्ये निर्माण केले जातील. यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना वेळ द्यावा लागेल असे सांगून त्यांनी नवनिर्वाचित संस्था पदाधिकारी व लिंगायत शरण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक करून अभिनंदन केले. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी महापौर चंद्रकांत बिरादार म्हणाले की, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे आणि सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांनी हातात घेतलेले कार्य सिद्धीस जाते याचा मला पूर्ण विश्वास आहे. या संस्थेद्वारे असलेल्या विविध प्रकारच्या शाळा, महाविद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातून शैक्षणिक सेवा सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून लवकरच ही संस्था मराठवाडा, महाराष्ट्र आणि देशभरात नावारूपास येईल असा आशावादही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदिनाथ सांगवे म्हणाले की, आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरून शासकीय प्रक्रिया निस्वार्थ भावनेने पार पाडली आहे. आम्हा सर्वांना महात्मा बसवेश्वर आणि देशिकेंद्र महाराज यांचा ईश्वररुपी आशीर्वाद मिळाला आहे. संस्थेमध्ये विश्वस्त म्हणून चॅरिटी स्वरूपात काम केले पाहिजे. चॅरिटी म्हणजे घरचे खायचे आणि बाहेरचे सामाजिक कार्य करायचे असा त्याचा अर्थ आहे. देशीकेंद्र महाराजांनी लावलेल्या रोपट्याचे रूपांतर आज मोठ्या वटवृक्षात झालेले आहे. त्याच्या सावलीमध्ये आपण सर्वांचा आणि समाजाचा विकास होईल. हे विराट आणि वाळवंटात काम करण्यासारखे आहे. पण या विकासरुपी मार्गातील काटे जरी आम्ही दूर करू शकलो तरी महात्मा बसवेश्वर आणि देशीकेंद्र महाराजांच्या विचाराचे स्वप्न पूर्ण होईल. आज बोलण्यापेक्षा कार्य करणे आवश्यक आहे. आम्ही सर्वांनी पुढील पन्नास वर्षाचे संस्था विकासाचे नियोजन केल्याचे सांगून त्यांनी उपस्थित मान्यवर आणि लिंगायत शरण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांचे सहृदय आभार मानले. यावेळी संस्थेचे नानिर्वाचित सचिव माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले की, शरण म्हणजे आश्रय देणे. महात्मा बसवेश्वरांच्या विचाराने पुनीत झालेली आणि देशीकेंद्र महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली मराठवाड्यातील ही पहिली शैक्षणिक संस्था आहे. देशीकेंद्र महाराजांनी १९४२मध्ये आपण समाजाचे देणे लागतो या उद्देशाने माधुकरी मागून वस्तीगृहाची निर्मिती केली. याच वस्तीगृहातून आज मोठ मोठे अधिकारी निर्माण झाले आहेत. या संस्थेच्या उभारणीमध्ये अँड.सांबप्पा गिरवलकर,मल्लिकार्जुनप्पा बिडवे, रामराव कवठाळे, विजयकुमार शेटे आदीं मान्यवरांचे मौलिक मार्गदर्शन व सहकार्य मिळाले आहे. या संस्थेला देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, बसवराज पाटील मुरूमकर, अर्चनाताई पाटील चाकूरकर आणि चंद्रकांत बिराजदार आदि मान्यवरांचे सुद्धा सातत्याने मार्गदर्शन मिळात आहे. महात्मा बसवेश्वरांच्या कायक वे कैलास या कर्मवादी सिद्धांताला अनुसरून भविष्यात संस्थेचे कार्य केले जाईल. आज लिंगायत समाजाला एकत्र येण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आपल्या देशात लोकशाहीची स्थापना मॅग्नाकार्टा यांनी केली नसून महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात ७७० विविध अठरापगड जातीतील लोकांना एकत्र करून अनुभव मंडपच्या माध्यमातून निर्मिती केली. भविष्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने संस्थेचे वाटचाल जलद गतीने घडून येईल असे सांगून संस्थेमध्ये आम्ही मालक म्हणून नव्हे तर सेवक म्हणून कार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेश विभूते यांनी केले. सूत्रसंचालन गुरुनाथ बिराजदार यांनी तर आभार महेश अंबुलगे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित संस्था पदाधिकारी, सर्व युनिटचे प्राचार्य,उपप्राचार्य, पर्यवेक्षक, कार्यालय प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, समाजातील प्रतिष्ठित नागरिक, बसवप्रेमी आणि पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिंगायत शरण फाऊंडेशन (महा.)चे इरण्णा पावले, विरेंद्र मंगलगे, प्रदीप बुरांडे, महेश पाटील, इंजि. राजकुमार कत्ते,सचिन संगशेट्टे, आर.सी.पाटील, गुरुनाथ हुच्चेकर, सूर्यकांत वाले, श्री. भिंगोले यांच्यासह प्राचार्य डॉ. संजय गवई, डॉ. सिद्राम डोंगरगे, मनोज मोटे,नामदेव बेंदरगे, राजाभाऊ बोडके, बालाजी डावकरे, सय्यद जलील आणि संभाजी लातूरे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात संभाजीनगर महानगपालिका शिक्षण सभापती प्रदीप बुरांडे आणि अँड.शेखर हविले यांचा सत्कार करण्यात आला.
More Stories
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
“सा.साक्षी पावनज्योत” विशेषांकाचे दिमाखदार प्रकाशन!
विद्याभवन हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश