August 8, 2025

गजानन विद्यालय देवधानोरा शाळेचे घवघवीत यश

  • कळंब – तालुक्यातील देवधानोरा येथील गजानन विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षा २०२४ इ.१० वी परिक्षेचा निकाल ९७ % लागला असून,विद्यालयाने यशाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. विशेष प्राविण्य-३, प्रथम श्रेणी-१५. द्वितीय श्रेणीत १०, विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
    प्रथम-कु. बोंदर श्रुती सुनील ( ९१.६०% ),द्वितीय-कु.सावंत अक्षरा तानाजी ( ९०.४०% ),
    तृतीय-कु.बोंदर श्रुती हनुमंत( ८२% ),
    चतुर्थ – कु. वाघमारे दीप्ती सुधीर(७९.४०%,) उत्तीर्ण झाले आहेत.
    वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन संस्था अध्यक्ष बलभीम च.बोंदर व विद्यालयाचे मुख्याध्यापक अप्पासाहेब बोंदर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रामस्थ,पालक . यांनी केले असून
    पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
error: Content is protected !!