कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दि.28 मे रोजी शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात 12 वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2024 मधील विविध शाखेतील गुणवंत विधार्थीचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ज्ञानप्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, प्राचार्य डॉ. सुनिल पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य पंडीत पवार, पर्यवेक्षक टेकाळे, संस्थेचे संचालक डॉ.संजय कांबळे यांच्या हस्ते खालील गुणवंताचा सत्कार करण्यात आला. कला शाखेतून सर्वप्रथम कु. वर्षा भगवान चौरे 84.17%, व्दितीय कु. अभंगे समृध्दी मोरेश्वर 79%, तृतीय. चि. जमाले ऋषिकेश तुकाराम 75%, विज्ञान शाखेतून सर्वप्रथम कुः कुलकर्णी समृध्दी संतोष 88.17 व्दितीय कु. आडसूळ दिक्षा दत्तात्रय 79.50 तृतीय सावंत पल्लवी विलास 75.50% तसेच वाणिज्य शाखा प्रथम चि पांचाळ कृष्णा यशवंत 79% द्वितीय तांबोळी अयान रफिक तर तृतीय कुलकर्णी पार्थ प्रशांत 75.50% तसेच किमान कौशल्यावर आधारीत अभ्यास क्रमातून सर्वप्रथम कु. माने स्नेहा नारायन सर्वप्रथम 68.50%. व्दितीय चि.पठाण दिशान अकबर 64.67% व सर्व त्ततीय चि. घोंगडे सूजित सूर्यकर्कात 60% प्रसंगी बोलतांना डॉ.अशोकराव मोहेकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणातील विविध क्षेत्रा- तील देश-विदेशातील करिअरच्या विविध संधी व परीक्षा या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच डॉ.पवार सुनिल यांनी महाविद्यालयातील, सेवासुविधा,अध्यापन या विषयी माहिती दिली व शिक्षणासाठी मोठ्या शहरात जावून प्रचंड पैसे खरचण्याची गरज नाही. या ठिकाणी ही मोठ्या संधी उपलब्ध आहेत हे त्यांनी या महाविद्यालयातून विविध क्षेत्रात उत्तम संधी मिळवणाऱ्या विद्यार्थीची उदाहरणे देवून स्पस्ट केले. तसेच ज्ञानप्रसारक मंडळाचे संचालक संजय कांबळे यांनी विविध शिक्षणतज्ञांनी सांगितलेले शिक्षणाचे महत्व विषद करुन गुणवंतांना भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी महाविद्यावयाचे उपप्राचार्य पंडीत पवार, पर्यवेक्षक टेकाळे सर यांनीही गुणवंताचे अभिनंदन करून य विविध शिक्षणातील संधी विषयी मार्गदर्शन केले. पालकांच्या वतीने पंचायत समिती कळंब चे माजी सभापती लक्ष्मण आडसूळ व जोशी यांनी मनोगत व्यक्त करुन मूलांच्या गुणवत्तेत महाविद्यालयाने केलेल्या प्रयत्नाचे कौतूक केले. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व कर्मचारी/ शिक्षकेत्तर कर्मचारी अमोल सुरवसे, अजय भावे व इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. विलास आडसूळ यांनी केले तर कार्यक्रमातील उपस्थितीचे आभार प्रा.काझी यांनी व्यक्त केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले