कळंब (महेश फाटक ) – अभ्यासू तसेच दूरदृष्टीने कसल्याही प्रसंगी कोणाचेही मन न दुखावता आपल्या संवादाने नागरिकांचे प्रश्नांची सोडवणूक करणारे काँग्रेस आय चे कळंब तालुकाध्यक्ष तथा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग(तात्या) कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातून बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी प्रकाशित होणारा सा.साक्षी पावन ज्योत चा विशेषांक व पथनाट्य व अग्रलेखांचा संग्रह असलेला “विरंगुळा” हे पुस्तक संपादक तथा लेखक सुभाष घोडके यांनी त्यांना सप्रेम भेट देवून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रसिद्ध व्यावसायिक सुरेश कटकुरे, धाराशिव जिल्हा प्रतिनिधी जयणारायण दरक,कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके,रोहन कुंभार, संघर्ष घोडके आदींची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले