कळंब (महेश फाटक) – दि.२६ मे २०२४ रोजी येरमाळा रोड मानधने पेट्रोल पंपा जवळ दोन मोटरसायकलचा अपघात होऊन एक जणाला आपला जीव गमववा लागला. सविस्तर माहिती नुसार हासेगाव (के) येथील श्यामसुंदर खापे (वय.४५) हे कळंब हून आपल्या बँकेचे दैनंदिन कलेक्शन करून सात आठ च्या दरम्यान घरी जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलने जोराची धडक दिल्याने खापे यांच्या मेंदूला मार लागल्याने आपला जीव गमवावा लागला. खापे हे बेशुद्ध अवस्थेमध्ये असताना तेथील नागरिकांनी घटनास्थळावरून कळंब येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. उपस्थित डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे जाण्याचे सांगितले.परंतु अर्धे वाटेत त्यांचा मृत्यू झाला. श्यामसुंदर खापे हे अल्पभूधारक असल्याने कळंब येथील एन.साई. पतसंस्थेमध्ये पिग्मी एजंट चे काम करत होते. सा.साक्षी पावन ज्योत चे निवासी संपादक रामेश्वर खापे यांचे ते पुतणे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,एक मुलगा, वडील व भाऊ असा परिवार आहे.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड