August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीस नामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.25 मे रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 227 कारवाया करुन 1,63,800 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • बेंबळी पोलीस ठाणे: आरोपी नामे- 1) वली अब्बास शेख, वय 57 वर्षे, रा. ताकविकी ता. जि. धाराशिव हे दि.24.05.2024 रोजी 23.20 वा. सु. ताकविकी येथे एनएच 361 चे सर्वसि रोड लगत अंदाजे 2,400 ₹ किंमतीची 25 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे: आरोपी नामे- 1) यलय्या रामय्या तेलंग, वय 56 वर्षे, रा. गुरुवाडी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.25.05.2024 रोजी 17.20 वा. सु. मळगी मोडच्या पुढे तुरोरी ते दगडधानोरा जाणारे रोडच्या बाजूस तुरोरी येथे अंदाजे 1,600 ₹ किंमतीची 15 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • मुरुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.25.05.2024 रोजी 14.40 ते 16.30 वा. सु. मुरुम पो.ठाणे हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे- 1) इस्माईल चॉदसाब रड्डे, वय 70 वर्षे रा. आलुर ता. उमरगा जि. धाराशिव हे 14.40 वा. सु. आलुर येथील तॉफीक पान टपरीचे समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 795 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 2)रज्जाक सरदार मुल्ला, वय 33 वर्षे, रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव हे 16.30 वा. सु. दाळींब येथील बस स्थानक जवळ कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 920 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये मुरुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.25.05.2024 रोजी 18.35 ते 20.32 वा. सु. धाराशिव शहर पोलीस ठाणे हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे- 1) दाउद कचरु पठाण, वय 30 वर्षे, रा. खॉजानगर ता. जि. धाराशिव हे 18.35 वा. सु. शिवाजी चौक ते सांजा जाणारे रोडलगत गॅलेक्झी पान शॉपचे पाठीमागे मोकळ्या जागेत मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 230 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. आरोपी नामे- 2)किरण राजेंद्र पेठे, वय 38 वर्षे, रा. लहुजी चौक नागनाथ रोड धाराशिव ता. जि. धाराशिव हे 20.32 वा. सु. लहुली चौक नागनाथ रोड येथे वसीम कुरेशी यांचे किराणा दुकानाचे शेजारी मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 570 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • भुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.25.05.2024 रोजी 12.15 वा. सु. भुम पो.ठाणे हद्दीत ओंकार चौक भुम येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- 1) कृष्णा मधुकर विर, वय 22 वर्षे, रा.विर गल्ली ता. भुम जि.धाराशिव हे 12.15 वा. सु. ओंकार चौक भुम येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 900 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • कळंब पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) विठ्ठल हणुमंत निकाळजे, वय 24 वर्षे, रा. शिवाजी नगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे दि.24.05.2024 रोजी 23.00 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन क्र एमएच 14 जी बी 3238 ही छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-रमेश रावसाहेब दुधे, वय 42 वर्षे, रा. लिंबोणी बाग 21 नंबर शाळेजवळ तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे राहते घराचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 23.05.2024 रोजी 11.00 ते दि. 24.05.2024 रोजी 19.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन लोखंडी पेटीतील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 35,000₹ असा एकुण 72, 500₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या रमेश दुधे यांनी दि. 25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • आनंदनगर पोलीस ठाणे : दि. 21.05.2024 रोजी 17.00 ते दि. 22.05.2024 रोजी 08.30 वा. सु. प्राथमिक आरोग्य केंद्र येडशी उपकेंद्र शिंगोली येथील टेक्सो कंपनीची विद्युत मोटार व केबल 270 फुट असा एकुण 27, 042₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-फुलाबाई बाबु कोळी, वय 51 वर्षे, व्यवसाय आरोग्य सेविका रा. वडगाव ह.मु. शिंगेली ता. जि. धाराशिव यांनी दि. 25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-बालाजी विष्णु मगर, वय 34 वर्षे, रा. खानापुर ता. जि. धाराशिव ह.मु. जिजाउ चौक मातोश्री बिर्याणी सेंटर समोर धाराशिव यांचा अंदाजे 7,000₹ किंमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल हा दि. 22.05.2024 रोजी 06.30 वा. सु. जिजाउ चौक मातोश्री बिर्याणी सेंटर समोर धाराशिव अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या बालाजी मगर यांनी दि. 25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-संजय बन्सीधर आखाडे, वय 39 वर्षे, रा. तुळजाई नगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 31,000₹ किंमतीची लाल रंगाची हिरो कंपनीची मॅस्ट्रो स्कुटी क्र एमएच 25 एआर 8146 जिचा इंजिन नं JF33ABKGB04202 व चेसी नं MBLJFW016 KGB04844 ही दि. 12.05.2024 रोजी 14.30 ते दि. 14.05.2024 रोजी 14.30 वा. सु. संजय आखाडे यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संजय आखाडे यांनी दि. 25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-प्रियदर्शनी प्रभाकर कांबळे, वय 29 वर्षे रा. बाबानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव या दि. 25.03.2024 रोजी 18.00 वा. सु. आठवडी बाजार मैदान कळंब येथे बाजार करत असताना अज्ञात व्यक्तीने प्रियदर्शनी कांबळे यांच्या पर्स मधील ओपो कंपनीचा मोबाईल अंदाजे 6,000₹ किंमतीचा चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रियदर्शनी कांबळे यांनी दि. 25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ दरोड्याची तयारी करणारे 5 इसम आनंदनगर पोलीसांच्या ताब्यात.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे : रात्रगस्त पेट्रोलींग दरम्यान आनंदनगर पोलीसांना दि. 25.05.2024 रोजी 01.00 वा. सु.अंबाला एमआयडीसी परिसर धाराशिव येथे आरोपी नामे- 1)राहुल राजु राठोड, वय 32 वर्षे, रा. सेवालाल कॉलनी तेरणा कॉलनी धाराशिव, 2) शेख सोहेल रफिक, वय 24 रा. जुना बस डेपो धाराशिव, 3) किरण गोविंद लोहार, वय 24 वर्षे, रा. देशापांडे स्टॅण्ड धाराशिव, 4) सागर विठ्ठल कांबळे, वय 29 रा. इंदीरानगर धराशिव, 5) विधी संघर्ष बालक हे काठी व धारधार शस्त्रासह दरोडा घालण्याच्या तयारीनिशी मिळून आले. पोलीसांची चाहुल लागताच मोटार सायकल सह पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पथकाने नमुद इसमांना काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल क्र एमएच 01 बीजे 6801 व विना नंबरची टीव्हीएस रोडीओऑन कंपनीची गाडी सह पथकाने त्यास पकडले. अशा मजकुराच्या गोरक्षनाथ बबन पालवे, वय 57 वर्षे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेमणुक आनंदनगर पोलीस ठाणे यांनी दि.25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खाबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 399 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ हायगयी व निष्काळजीपणे वाहन व यंत्र चालवून मयताचे मारणास कारणीभुत होणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • बेंबळी पोलीस ठाणे : आरोपी नामे- सुकुमार जिनाप्पा बसरगे, रा. मजेरवाडी ता. जि कोल्हापुर यांनी दि. 24.05.2024 रोजी 23.00 ते दि 25.05.2024 रोजी 07.00 वा. सु. ताकविकी शिवार आण्णासाहेब गिराम यांचे शेतात त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर क्र एमएच 25 एस 3891 हा हायगयीने व निष्काळजीपणे चालविलेने यातील मयत नामे- तानाजी गोरोबा डोलारे, वय 55 वर्षे, रा. ताकविकी ता. जि. धाराशिव हे ट्रॅक्टर/ रोटर मध्ये सापडून गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद आरोपीने मयतावर कोणतेही उपचार न करता व अपघाताची माहिती न देता मयताचे प्रेत घटनेच्या ठिकाणावरुन निलंगे यांचे शेताचे बाजूला असलेल्या कॅनलमध्ये टाकून पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मेसुबाई तानाजी डोलारे, वय 50 वर्षे, रा. ताकविकी ता. जि. धाराशिव यांनी दि.25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 304(अ), 287, 201 भादवि सह कलम 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे : आरोपी नामे-आनंद बालाजी भोसले, बालाजी राजकुमार भोसले, शैलेश राजकुमार भोसले, तिघे रा. दिंडेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.19.05.2024 रोजी 08.30 वा. सु. बालाजी राजकुमार भोसले यांचे घराजवळ दिंडेगाव येथे फिर्यादी नामे-सोपान गोविंद क्षिरसागर, वय 65 वर्षे, रा. दिंडेगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मोटर सायकलने धडक देवून जखमी केले. व जातीवाचक शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने बोटावर मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सोपान क्षिरसागर यांनी दि.25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 307, 326, 323, 504, 506, 34 सह अ.जा.ज.अ. प्र.कायदा कलम 3(1)(आर)(एस), 3 (2) (व्ही) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे : आरोपी नामे-बापुराव राजाभाउ सुरवसे,(मेढेकर), सिध्दांत बापूराव सुरवसे,(मेढेकर),संतोष माणिक सुरवसे ,(मेढेकर), खंडु महादेव सुरवसे (मेढेकर), धिरज खंडु सुरवसे (मेढेकर), सुरज खंडु सुरवसे,(मेढेकर), सर्व रा. सुंभा ता. जि. धाराशिव यांनी दि. 17.05.2024 रोजी 19.00 वा. सु. जागजी शिवारातील पेट्रोल पंपाजवळ फिर्यादी नामे-गणपती देविदास मुळे, वय 54 वर्षे, रा. सुंभा ता. जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड, लोखंडी गज, कुह्राडीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गणपती मुळे यांनी दि.25.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 326, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
  • “खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड.”
  • स्थानिक गुन्हे शाखा मयत नामे- संदेश भाउसाहेब पाटील, वय 23 वर्षे, रा. करजखेडा ता. जि. धाराशिव यांचा दि. 24.05.2024 रोजी करजखेडा येथे त्यांचे राहते घरासमोर ओठ्यावर झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने ढोक्यात दगड घालून जिवे ठार मारले. यावरुन बेंबळी पोलीस ठाणे येथे दि. 25.05.2024 रोजी भा.दं. वि. सं. कलम- 302, 34 अन्वये गुन्हा क्र. 129/2024 हा नोंदवला आहे.
  • सदर गुन्ह्यातील तपासा दरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव मोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटके, श्री अमोल मोरे, पोहेकॉ/530 अमोल निंबाळकर, पोहेकॉ/327 विनोद जानराव, सय्यद हुसेन, जावेद काझी, पोना/ 1479 नितीन जाधवर, पोना/1611 बबन जाधवर, मपोहा/ शैला टेळे, चालक पोहेकॉ/ संतोष लाटे, पोहेकॉ/67 विजय घुगे, चालक पोकॉ/564 प्रशांत किवंडे असे पथके रवाना झाले. पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर मयत नामे संदेश भाउसाहेब पाटील हा घरात नेहमी वडील व भावा सोबत जमीणीचे वाटणीचे कारणावरुन व नवीन चारचाकी कार खरेदीचे कारणावरुन भांडण तक्रारी शिवीगाळ करत होता. त्याचे नेहमीच्या या कारणामुळे वडील व भाउ वैतागले होते. त्याचाच राग मनात धरुन वडील नामे भाउसाहेब गोविंदराव पाटील व भाउ नामे प्रितम भाउसाहेब पाटील या दोघांनी संगणमत करुन दि. 24.05.2024 रोजीचे मध्यरात्रीचे सुमारास मयत नामे संदेश भाउसाहेब पाटील हा राहतेघरासमोरील ओट्यावर झोपला असताना त्यास झोपेतच डोक्यात दगड घालून जीवे ठार मारले आहे.अशी खात्रीशीर माहिती मिळल्यावरुन पथकाने नमुद आरोपी वडील नामे- 1)भाउसाहेब गोविंदराव पाटील, 2) भाउ नामे- प्रितम भाउसाहेब पाटील रा. करजखेडा ता. जि. धाराशिव यांना ताब्यात घेवून नमुद आरोपीकडे सदर गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता सदरचा गुन्हा आम्हीच केला आहे अशी कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही कामी पो स्टे बेंबळी येथे हजर केले.
  • सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक- श्री. वासुदेव मोरे, सपोनि- श्री. अमोल मोरे, श्री. सचिन खटके, पोहेकॉ/अमोल निंबाळकर, विनोद जानराव, सय्यद हुसेन, जावेद काझी, नितीन जाधवर, बबन जाधवर, मपोहा/ शैला टेळे, चालक पाहेकॉ/ संतोष लाटे, घुगे, चापोकॉ/ किवंडे यांच्या पथकाने केली आहे.
error: Content is protected !!