August 8, 2025

जिल्हा परिषद शाळेच्या क्रीडांगणाचे काम रखडले

  • शिराढोण (आकाश पवार) – कळंब तालुक्यातील शिराढोण येथे शिराढोण परिसरामधील सर्वात मोठी शाळा म्हणून आंतरराष्ट्रीय जि.प.प्रशाला शिराढोण या शाळेचे नाव ओळखले जाते.या शाळेमध्ये
    क्रीडांगण तयार करण्यासाठी आदर्श शाळेचा निधी मागवण्यात आलेला होता.त्याप्रसंगी या कामाचे कंत्राटदार कोळगे तसेच त्यांचे सहकारी तांबोळी हे या शाळेवरच्या क्रीडांगणाचे काम पाहत आहेत.या मैदानामध्ये काम करते वेळेस मध्यापानाच्या बाटल्या दिसून आल्या. या कामाला अद्यापही चांगल्या पद्धतीची सुरुळीत सुरुवात झालेली नाही. प्रशालेचे मुख्याध्यापक अर्जुन जाधव यांनी कोळगे यांच्याशी खूप वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तब्बल १०७ वेळा कॉल केल्यानंतर त्यांनी त्यापैकी फक्त सात कॉल उचलून एवढेच बोलले की, सर आम्ही काम करत आहोत, आज चालू होईल, आज नाही झाले तर उद्या आम्ही नक्की चालू करून घेऊ, असे म्हणत आज तब्बल दोन महिने पूर्ण होतात. या कालखंडामध्ये प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा शिक्षकांनी मुख्याध्यापकाशी या कामाबद्दल सांगून या कामावरती कंत्राटदार यांनी कसल्याही पद्धतीचा निर्णय न घेता निवांतपणे राहत असल्याचे चित्र दिसून आलेले आहे.बांधकामामध्ये मजबुतीकरण दिसून येत नाही.संपूर्ण बोगस काम रेटण्याची तयारी सुरु आहे. या क्रीडा प्रणांगणामध्ये क्रीडाचे विद्यार्थी या प्रणांगणामध्ये येत असून, या प्रणांगणामध्ये कसल्याही पद्धतीची सराव करण्याचा मानस नाही. यामध्ये सराव करीत असताना येणारे अडथळे म्हणजेच प्रणांगणामध्ये मोठ मोठे खड्डे असल्याचे दिसून आलेले आहे. आज तब्बल तीन ते चार दिवस झाले अभियंता रोजच म्हणतात कि,मी मुरूम टाकायला सांगितला आहे.परंतु आम्ही त्यांच्या सांगण्यावर रात्री १२ वाजेपर्यंत थांबलो होतो.अशी प्रतिक्रिया व छायाचित्र दाखविण्यात आले आहे. अशा पद्धतीला सामोरे जावे लागत आहे.या वाढत्या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये प्रनांगण पूर्ण चिखल – चिखल होईल. त्यानंतर कंत्राटदाराला काम करता येणार नाही.याची वरिष्टांनी काळजी घ्यावी अशी माहिती गावातील पालकांनी सुद्धा त्यांची भूमिका मांडली.
  • @ प्रशालेच्या मुख्याध्यापकांना अभियंता कडून हुलक्या-
    ‘मी प्रशालेमध्ये असताना किंवा घरी असताना प्रशालेवरील क्रीडा प्रणांगण सुरू असलेल्या कामासंदर्भामध्ये विचारपूस करण्यासाठी या कामाचे कंत्राटदार, अभियंता,तांबोळी व त्यांचे सहकारी यांच्या सतत संपर्कामध्ये असताना मी अभियंता यांना तब्बल १०७ वेळा कॉल लावून सुद्धा त्यांनी फक्त सात कॉल उचलून असे म्हणले की, आम्ही काम करत आहोत तुम्ही त्या बाबतीत निश्चित रहा, मी कामगारांना सांगितले आहे, ते आज करून घेतील त्यांचे अशा पद्धतीचे प्रत्युत्तर येत होते. त्यानंतर त्यांनी प्रशालेमध्ये समोरासमोर आल्यानंतर मी त्यांना असे विचारले की आपल्या या आराखड्याच्या नकाशामध्ये एकूण ५२० विद्यार्थ्यांचा डायनिंग हॉल बनावयाचा आहे. तरीसुद्धा आपण फक्त २५ विद्यार्थ्यांचा डायनिंग हॉल बनवला आहे. त्यावर अभियंता साहेबांनी असे सांगितले की, आपण आराखडा सुरुवातीला पाहत असताना लहान दिसतो परंतु बांधकाम झाल्यानंतर तो मोठा दिसेल असे मस्करीचे प्रत्युत्तर मला मिळाले. यावर त्यांना मी कंपाउंड वॉल बद्दल सुद्धा बोललो त्यावर त्यांनी बोलले की, आपणाला मिळालेली रक्कम हे पुरेशी नाही. आपल्याला आणखीन फंड लागेल, तरीदेखील या फंडांमध्ये जेवढं काही होईल तेवढं मी करून घेईल, असे वारंवार त्यांनी उत्तर देत होते. त्यांनी कामावरती असताना सातत्याने काम केल्याचे दिसून आले नाही. मी त्यांच्या सहकाऱ्यांशी सुद्धा बोलल्यानंतर ते बोलले की तुम्ही साहेबांशी बोलून घ्या. मी साहेबांना कॉल लावत होतो अभियंता साहेब माझा कॉल घेत नव्हते, कधी संपर्क क्षेत्राच्या बाहेर, कधी फोन बंद अशा पद्धतीचे मला प्रसंग आढळून आले. सदरील सुरू असलेले क्रीडा प्रणांगण हे तब्बल मे महिन्यामधील २०२३ ते आज मे महिना २०२४ या कालखंडामध्ये पूर्णतः आज एक वर्ष पूर्ण झाले. तरी देखील काम रखडलेले च आहे’.
  • – अर्जुन जाधव
    ( मुख्याध्यापक – जि.प.प्रशाला शिराढोण )
  •  गावातील पालकांची मैदानाविषयी नाराजगी
    गावातील वरिष्ठ नागरिक आपल्या प्रशाला मध्ये योगासनासाठी पहाटे नियमितपणाने जातात परंतु त्यांना सुद्धा या मैदानावर योगासन करीत असताना खड्डे चढ-उतार अशा गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे, आणि आम्ही सर्वजण योगासनासाठी दुसरीकडे मैदान उपलब्ध नसल्यामुळे आम्ही सर्वजण प्रशालेमध्येच योगासन व्यायाम, पोलीस भरतीचे विद्यार्थी सुद्धा येथे शारीरिक चाचणीची तयारी करीत असल्याचे चित्र दिसून आलेले आहे. त्यांना देखील या ठिकाणी गोळा फेक ची तयारी करण्यासाठी मैदान व्यवस्थित नसल्यामुळे येथे विद्यार्थी येऊन तयारी करण्याची त्यांची मानसिकता नाही. रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करावे अथवा दुसऱ्या गरजवंत कंत्राटदाराला रक्कम देऊन त्यांना काम करू द्यावे.
    – महेश पवार ( शिराढोण – पोलीस भरती विद्यार्थी )
  •  स्पर्धकांच्या स्वप्नावर फेरणार पाणी
    मैदानावर तयारी करण्यासाठी दहावी उत्तीर्ण केलेले विद्यार्थी, बारावी मध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थी व पदवीसाठी प्रवेश केलेले विद्यार्थी अशा पद्धतीचे सर्व विद्यार्थी याच मैदानावर येऊन आपल्या क्रीडा कौशल्याची तयारी करीत असल्याचे करीत आहे. या मैदानावर कसल्याही पद्धतीची सुविधा नसल्याने येत्या काळामध्ये हे सर्व विद्यार्थी मैदानी स्पर्धेमध्ये हॉलीबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो-खो, या सर्व खेळांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी करण्यासाठी त्यांच्याकडे मैदान उपलब्ध असून त्याचा काही उपयोगच नाही. त्यामध्ये खड्डे चढ-उतार यासारख्या गोष्टींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. जर नजीकच्या काळामध्ये यापूर्वी काही विद्यार्थी राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत जाऊन आले आहेत. अशा पद्धतीचा निकाल या मैदानावरील विद्यार्थ्यांनी आणला आहे. जर इथून पुढे विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये काही बाधा निर्माण झाली तर त्याला सर्वस्व पदाधिकारी जबाबदार राहतील.
  • – गोविंद म्हेत्रे
    ( अध्यक्ष – महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब शिराढोण )
error: Content is protected !!