वाशी (साक्षी पावणज्योत वृत्तसेवा) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तालुक्यातील पिंपळगाव(लिंगी) मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली येथील संभाजी विद्यालयात दिनांक १ मे २०२४ रोजी महाराष्ट्राचा ६५ वा स्थापना दिवस व ‘कामगार दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यंशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे शालेय समितीचे अध्यक्ष श्रीमान पंडीतराव कोल्हे व शालेय समितीचे सर्व सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण सकाळी ठिक ०७.०५ वाजता प्रशालेचे मुख्याद्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत “जन- गण- मन” व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येवून राज्य गीत “जय जय महाराष्ट्र माझा” या गितांचे गायन करण्यात आले. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसांचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी ठिक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण आजच्या दिवशी केले जाते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला. या प्रसंगी शालेय समितीचे सदस्य श्रीमान दिलीपराव कुलकर्णी, शिवाजीराव सुकाळे , रमेश सुकाळे आवर्जून उपस्थित होते. या वेळी इयत्ता ८ वी चा द्वितीय सत्र व इयता ९ वीचा वार्षिक निकाल गुणपत्रक स्थानिक शालेय समितीच्या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात आले. त्यानंतर विद्यालयात विविध सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरीक , सेवानिवृत्त सेवक आश्रुबा खंडागळे, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी, प्रशालेतील सर्व शिक्षक सुनिल बावकर, संतोष ढोले, संतोष बोडके, सुहास जगताप, तर शिक्षकेत्तर शिवराम शिंदे, (पत्रकार दै. जनमत ) लहु फुरडे उपस्थित होते.
More Stories
शिवशक्ती सहकारी साखर कारखानाच्या वतीने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा सत्कार
वाशी येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी अर्ज मागविले
हनुमंत पाटुळे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित