धाराशिव (माध्यम कक्ष) – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच मतदान शांततेत पार पडावेत यासाठी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात ज्या गावांमध्ये आठवडी बाजार भरतात ते बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील उमरगा,तुळजापूर, उस्मानाबाद व परंडा हे विधानसभा मतदारसंघ,लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील धाराशिव तालुक्यातील ढोकी,समुद्रवाणी, कसबे तळवडे,चिखली,तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर व काटी,उमरगा तालुक्यातील कसगी,माडज,लोहारा तालुक्यातील माकणी,धानोरे व जेवळी, परंडा तालुक्यातील अनाळा व वाकडी आणि कळंब तालुक्यातील गोविंदपुर या गावांमध्ये मतदानाच्या दिवशी बाजार भरणार नसून अन्य दिवशी बाजार भरवता येईल.असे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला