August 8, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.25 मार्च रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 211 कारवाया करुन 1,45,200 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • धाराशिव शहर पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)अजीम अय्युब शेख, वय 29 वर्षे, रा. आगडगल्ली धाराशिव दि.25.03.2024 रोजी 16.42 वा. सु. आठवडी बाजरात जाणारे रोडच्या उजवेबाजेस ईश्वर इंगळे यांचे पत्राचे शेडच्या समोर मोकळ्या जागेत धाराशिव येथे अंदाजे 6,360 ₹किमतीची 106 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • तुळजापूर पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)शरद खंडु सातपुते, वय 24 वर्षे, रा. सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.25.03.2024 रोजी 18.40 वा. सु. सिंदफळ बस स्टॅडचे बाजूस असलेल्या ओढयातील आपटयाचे झाडाखाली अंदाजे 2,100 ₹किमतीची 30 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • येरमाळा पोठाच्या पथकास आरोपी नामे-1)सुरेश पापा शिंदे, वय 52 वर्षे, रा. संभाजी नगर येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.25.03.2024 रोजी 19.45 वा. सु. आरोपीच्या राहते घरासमोरील मोकळ्या जागेत संभाजी नगर येरमाळा येथे अंदाजे 3,900 ₹किमतीची 35 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे : आरोपी नामे-आच्युत भास्कर हजारे, वय 30 वर्षे, रा. वाडीवाघोली ता.जि. लातुर यांनी भोसले हायस्कुल परिसरातुन हिरोहोंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 14 सीटी 4333 अंदाजे 40,000₹ किंमतीची ही चोरुन घेवून जात असताना दि. 25.03.2024 रोजी 02.00 ते 03.00 वा. सु. बसस्थानक समोरील रोडवर धाराशिव येथे आनंदनगर पोलीसांना मिळुन आला. यावरुन फिर्यादी नामे- राजेश कांताराम शेटे पोलीस हावलदार- 690 नेमणुक पोलीस ठाणे आनंदनगर यांनी नमुद आरोपीविरुध्द दि.25.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 107/2024 कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
  • आंबी पोलीस ठाणे : आरोपी नामे-विलास भारत घोडके, 2) बेलेश्वर दत्तात्रय गुडे, रा. आवारपिंपरी ता. परंडा, 3)अभिषेक अजिनाथ गुडे, 4) वैभव लक्ष्मण गुडे, 5) सुजित दिगंबर गुडे सर्व रा. आवार पिंपरी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 25.03.2024 रोजी 12.50 वा. सु. आनाळा ते कडांरी रोडवर आनाळा गावाचे शिवारात ता. परंडा जि. धाराशिव सोनालिका ट्रॅक्टर व ट्रॉली सह एक ब्रास वाळू 6,05,000₹ किंमतीची व स्वराज कंपनीचा एक्स टी 744 ट्रॅक्टर व ट्रॉली सह एक ब्रास वाळू 7,05, 000₹ किंमतीची असा एकुण 13,10,000₹ किंमतीचे लाबाडीच्या इराद्याने गौनचनिज वाळु चोरु करुन चोरटी विक्री करण्यासाठी घेवून जात असताना मिळून आले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामेरामकिसन दगडु कुंभार, वय 35 वर्षे नेमणुक पोलीस स्टेशन अंबी यांनी दि.25.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे 379, 114, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • परंडा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) अमोल राजेंद्र शिंदे, वय 28 वर्षे, 2) अमर सुभष शिंदे, वय 22 वर्षे, 3) अमर हणुमंत यादव, वय 30 वर्षे, 4)सुरज अदलिंगे वय 32 वर्षे, सर्व रा. आसु ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 30.09.2023 रोजी 00.30 वा. सु. आसु ता. परंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागे महादेव मंदीरा जवळ रोड लगत आसे येथुन फिर्यादी नामे- मारुती पंडु शिंदे, वय 32 वर्षे, रा. लोणी ता. परंडा जि. धाराशिव यांच्या मारुती आल्टो कार 800 क्र एमएच 14 डीएक्स 3302 च्या चोरी करण्याच्या उद्देशाने सर्व काचा फाडून दरवाज्याचे लॉक तोडून गाडीतील पुढच्या ड्राव्हर मधील रोख रक्कम 10,000₹ तसेच हवा भरणेच्या चार्जर चोरुन नेले. तसेच गाडीच्या सर्व काचा व दरवाज्याचे लॉक तोडून अंदाजे 40,000₹ चे नुकसान केले. वगैरे मा. न्यायलयाचे जा. क्र. फौ 430/2024 न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग परंडा कोर्ट नं 3 अन्वये एम केस वरुन फिर्यादी नामे मारुती पंडू शिंदे, वय 32 वर्षे रा. लोणी ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.25.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे 379, 427, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)बुबासाहेब भागवत जाधव, 2) भाउसाहेब उर्फ भाउराव भागवत जाधव, 3) संजय भाउराव जाधव, 4) किशोर भाउराव जाधव, 5) अमर बुबासाहेब जाधव , 6) रेश्मा प्रशांत थोडसरे सर्व रा. तेर ता. जि. धाराशिव दि.24.03.2024 रोजी 20.00 वा. सु. आराधना कलेक्शन कापउ दुकानासमोर फिर्यादी नामे- प्रशांत सुरेश थोडसरे, वय 32 वर्षे, रा. तेर ता. जि. धाराशिव यांना कपड्याचे दुकान उघडण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी फळी व उसाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रशांत थोडसरे यांनी दि.25.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे 143, 147, 324, 323, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)अजय रवी जाधव, 2)मिथुन सुखदेव जाधव, 3) लिंबाजी सुखदेव जाधव, 4)रवी सुखदेव जाधव, 5) हरीश टिकाराम जाधव, 6) धोंडीबा बंडु जाधव, 7) अक्षय रवी जाधव, 8) मोहन रोहीदास पवार, 9) सुमीत नितीन जाधव, 10) गोरख टिकाराम जाधव, 11) शिवाजी टिकाराम जाधव, 12) राज राठोड सर्व रा. शिवाजी नगर खडक तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.25.03.2024 रोजी 15.00 वा. सु. खडकी शिवारात फिर्यादी नामे- शशिकांत भिमा राठोड, वय 40 वर्षे, रा. खडकी तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना व फिर्यादीचा पुतण्या यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शशिकांत राठोड यांनी दि.25.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे 143, 147, 148, 324, 323, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)सुभाष भिम राठोड, 2) अमित सुभाष राठोड, 3) अजित उर्फ राहुल सुभाष राठोड, 4) शशिकांत भिमा राठोड, 5) रवि पदमाकर चव्हाण, 6) विशाल शशिकांत राठोड सर्व रा. खडकी तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. दि.25.03.2024 रोजी 15.00 वा. सु. खडकी तांडा येथील सेवालाल मंदीराचे बाजूला रोडवर फिर्यादी नामे- लिंबाजी सुखदेव जाधव, वय 40 वर्षे, रा. खडकी तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-लिंबाजी जाधव यांनी दि.25.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे 143, 147, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ रस्ता अपघात.”
  • उमरगा पोलीस ठाणे : मयत आरोपी नामे- सय्यद साबेर हुसेन सय्यद मुजीब हुसेन, वय 34 वर्षे, रा. हुडगी ता. हुमनाबाद जि. बिदर हे जयसिंगपूर जि. सागंली येथुन सोलापुर ते उमरगा दि.24.03.2024 रोजी 01.00 वा. सु. ट्रक क्र केए 56-0247 मधून जात होते. दरम्यान येळी गावच्या पुढे लकी ढाबा समोर ता. उमरगा येथे आरोपी मयत नामे सय्यद साबेर हुसेन यांनी त्याचे ताब्यातील ट्रक ही हायगई व निष्काळजीपणे चालवून झोपेच्या तंदरीत ट्रक पलटी करुन ट्रकचे कॅबीन खाली दबुन स्वत:चे मरणास कारणीभुत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अब्दुल साजीद अब्दुल गफार मौजन, वय 36 वर्षे, रा. हुडगी, ता. हुमनाबाद जि. बिदर यांनी दि.25.03.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “गोमांसाची वाहतुक करणाऱ्या विरुध्द परंडा पोलीसांची धडक मोहीम.”
  • दिनांक 25.03.2024 रोजी परंडा शहरात व परिसरात गोवंश जनावरांची अवैध कत्तल करणाऱ्याविरुध्द परंडा पोलीसांनी मोहीम हाती घेतली आहे. यापुर्वी परंडा पोलीसांच्या पुढाकारातुन परंडा येथील अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले होते. तथापी, चोरुन लपवून गोवंश जनावरांची कत्तल होत असल्यास त्याबाबत गोपनीय माहिती मिळविण्याकरीता गोपनिय यंत्रणा सक्रिय करण्यात आलेल आहे. याचाच एक भाग म्हणून दि.25.03.2024 रोजी परंडा पोलीसांना प्राप्त गोपनीय माहितीनुसार गोमांसाची वाहतुक करणाऱ्या वाहनास पकडण्यास यश आले आहे. जुने तहसिल कार्यालयासमोर सापळा रचून गोमांसाची वाहतुक करणारे वाहन पकडण्यात आले. सदरील वाहनावर वाहन क्रमांक MH 42 BF 2660 नमुद आहे. वाहन चालक इम्रान मशीर शेख याला ताब्यात घेण्यात आले आहे. वाहनचालकाकडे आणखी साखेल चौकशी केली असता त्याने सागिंतले की तो स्वत: बिगवन येथील रहिवासी असुन आजूबाजूच्या परिसरातुन जिवंत जनवरे विकत घेतली जातात आणि त्यानंतर ती जनावर परंडा येथे आणली जातात. परंडा येथे आल्यावर शाहबाज अजीज सौदागर यांच्या अवैध कत्तलखान्यावर त्या जनावरांची कत्तल केली जाते. चौकशीमध्ये आतापर्यंत दोन आरोपी निष्पन्न झालेले आहेत. सर्व आरोपींविरुध्द गुरनं 66/2024 अन्वये कलम 429 भ.द.वि.सं. सह कलम 5(सी), 9(ए) महाराष्ट्र प्राणि संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदरील गुन्ह्यात वाहन आणि गोमांस असा एकुण 8,86,000₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री किरण घोंगडे करीत आहेत.
  • सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी भुम श्री गैरी प्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती कवतिा मुसळे, पोलीस उप निरीक्षक श्री. किरण घोंगडे, पोलीस हावलदार फिरोज शेख, महिला पोलीस हावलदार पायाळे, पोलीस नाईक नितीन गुंडाळे, पोलीस अंमलदार- सुर्यजीत जगदाळे, श्रीकांत गायकवाड, डिकोळे यांचे पथकांनी केली आहे.
error: Content is protected !!