August 8, 2025

रंगपंचमी सणानिमित्त 30 मार्च रोजी दारू विक्री दुकाने बंद

  • धाराशिव (जिमाका) – जिल्हयात 30 मार्च-2024 रोजी रंगपंचमी हा सण /उत्सव साजरा केला जाणार आहे.त्यानिमित्त रंगपंचमी हा सण शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने सार्वजनिक शांतता कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून मुंबई दारुबंदी कायदामधील कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी यांना प्राप्त आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हयातील सर्व देशी,विदेशी, एफएल-2,सीएल-3,एफएलबीआर -2,परवानाकक्ष अनुज्ञप्त्या,एफएल -4 अनुज्ञप्त्या,ताडी विक्री अनुज्ञप्त्या, 30 मार्च-2024 रोजी बंद ठेवण्याचे तसेच त्यावरील मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांनी दिले आहे.
  • या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कायद्यातील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
error: Content is protected !!