सातारा (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा) – देवगिरीचे यादव ऊर्फ जाधव हा ऐतिहासिक दस्तऐवज अर्थशास्त्राचे प्राध्यापक व इतिहास संशोधक प्रा.अर्जुन जाधव यांनी आपल्या हातात सोपवला आहे, अशा प्रकारचे गौरवोद्गार प्राच्यविद्या पंडित ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह.साळुंखे यांनी येथे बोलताना काढले. येथे अनौपचारिक कार्यक्रमांमध्ये लोकायत प्रकाशनच्या वतीने प्रा. अर्जुन जाधव लिखित ‘देवगिरीचे यादव ऊर्फ जाधव’ हा संशोधनात्मक ग्रंथाचे लोकार्पण प्रा.डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. हा ग्रंथ संशोधकांसाठी उपयुक्त ठरेल,असेही त्यांनी सांगितले. स्वराज इंडियाचे प्रा.अर्जुन जाधव हे अखंडपणे संशोधन करत आहेत.देवगिरीचे यादव उर्फ जाधव हा संशोधनात्मक ग्रंथ उपयुक्त ठरेल,असेही प्रा.डॉ.आ. ह.साळुंखे यांनी सांगितले. रामदास निकम यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी प्रा.अविनाश लेवे,विजय मांडके,अभियंता तुकाराम मचे, अँड.वृषाली दांडेकर,सागर जाधव,भानुदासराव कदम आदी उपस्थित होते.
More Stories
“परिवर्तन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ” पुरस्काराने कमलाकर शेवाळे सन्मानित
शिक्षणाचा प्रसार मराठवाड्यात करणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
जनकल्याण अर्बन को-ऑप बँक २०२४ वर्षी बँको ब्लू रिबन पुरस्काराने सन्मानित