धाराशिव (विशाल पवार ) – येथील रोहन शिवाजीराव जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग एक या पदासाठी निवड झाली आहे. त्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या वतीने रोहन जाधव यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार राजा वैद्य, इकबाल पटेल व माजी शिक्षणाधिकारी शिवाजीराव जाधव व परिवार उपस्थित होता. रोहन जाधव यांचे संपूर्ण शालेय शिक्षण धाराशिव शहरामध्ये झाले आहे.एक होतकरू तरुण सध्या नगरपालिकेत कर निरीक्षक या पदावर कार्यरत असणारा नोकरी सांभाळून राज्य आयोगाच्या वर्ग एक पदाला त्यांनी गवसणी घातली आहे. त्याबद्दल सर्व स्तरातून रोहन जाधव यांचे कौतुक होत आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला