August 8, 2025

धाराशिव लोकसभा मतदारसंघात धनगर समाज उमेदवारी देणार

  • धाराशिव (परमेश्वर खडबडे ) –
    धाराशिव येथे दि. 24 रोजी जंत्रा फंक्शन हाॅल येथे यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव लोकसभा निवडणुकी संदर्भात महत्वाची बैठक पार पडली.
    या बैठकीत महाराष्ट्रात ठिक ठिकाणी धनगर समाजाला उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. भाजप सेनेने धनगर समाजाला कसे फसवले? महाराष्ट्रात दोन नंबरला असलेल्या समाजाचा आजपर्यंत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने आजपर्यंत एकाही खासदार होऊ दिला नाही यासह अनेक विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
    या बैठकीला अँड. गुंडेराव बनसोडे, चंद्रकांत बनसोडे, प्रा. धनूषंकर टिळे, शिवाजी शिंदे, गावडे बुवा, प्रा.सोमनाथ लांडगे, पत्रकार अजित गायके,दत्ता काळे, हरीभाऊ कोळेकर, गजेंद्र खोत, राजेंद्र घाटुळे,विरमल तरंगे, बंडु लांडगे, भाऊसाहेब तरंगे, डॉ. शेवाळे एन जी, अजय साठे, भाऊसाहेब शेंडगे, लक्ष्मण शिंदे व समाजातील कार्यकर्ते मोठ्यासंखेने उपस्थित होते.
error: Content is protected !!