लातूर (दिलीप आदमाने) – महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विषयातील बी. एस्सी. तृतीय वर्षाचा विद्यार्थी श्रीकांत आनंदराव अनमूलवाड हा आयआयटी जाम या परीक्षेमध्ये नुकताच उत्तीर्ण झाला आहे. त्याचा दि.२६ मार्च २०२४ रोजी प्राचार्य कक्षामध्ये प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, विज्ञान शाखा समन्वयक डॉ. दीपक चाटे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंतोष स्वामी, डॉ. जितेंद्र देशमुख आणि कार्यालय प्रमुख नामदेव बेंदरगे यांची उपस्थिती होती. श्रीकांत आनंदराव अनमूलवाड हा विद्यार्थी कापरवाडी ता. मुखेड जि. नांदेड येथील रहिवासी असून त्याचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी आहे. त्याची कौटुंबिक परिस्थिती सर्वसाधारण असूनही त्याने अतिशय कठीण असलेली आयआयटी जाम ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नामध्ये उत्तीर्ण केली. यामुळे त्याला आयआयटीमध्ये प्रवेश मिळणे सहज शक्य झाले आहे तो सुरुवातीपासूनच अभ्यासू आणि चिकित्सक विद्यार्थी आहे आणि त्याला रसायनशास्त्र विषयांमध्ये अधिक रुची आहे. त्याला रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंतोष स्वामी आणि डॉ. जितेंद्र देशमुख यांचे सतत मार्गदर्शन लाभले. त्याच्या उज्वल यशाबद्दल श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव व इतर सर्व संचालक, प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शाखा समन्वयक, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे