August 8, 2025

कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा मोठ्या उत्साहात संपन्न

  • कळंब ( माधवसिंग राजपूत) – शिवसेना पक्षामुळे सामान्य कार्यकर्त्याला मान सन्मान मिळाला टपरी चालवणाऱ्या कुटुंबातील आमदार खासदार झाले सर्व आदरणीय कै. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच घडले आज गट करून हे लोक विरोधात गेले आहेत निवडणुकीत जनता त्याचा हिशोब चुकता करणार आहे आपण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील असून जिल्ह्यातील विरोधक काम कमी प्रसिद्धी जास्त करतात कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत मतदारांनी विश्वास ठेवून निवडून दिले त्यांचा हाच विश्वास सार्थ करण्यासाठी सभापती शिवाजी कापसे काम करीत आहेत . त्यांच्यामुळे निर्माण होत आहे असे विचार धाराशिव मतदार संघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब च्या 69 व्या सर्वसाधारण सभेत दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजी कापसे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कैलास घाडगे पाटील,कळंब विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दयानंद गायकवाड ,धाराशिव नगर परिषदेचे माजी अध्यक्ष नंदूराजे निंबाळकर, उपसभापती प्रा. श्रीधर भवर, ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, जिल्हा परिषद माजी सदस्य कांचनमला संगवे, काँग्रेस आय तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेचे संचालक प्रा.संजय कांबळे, बळवंत तांबारे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी आपल्या भाषणात मांजरा नदीवर बॅरेजेस बांधणे, कळंब तालुक्यात विद्युत व्यवस्था सुरळीत करणे तसेच लासरा बॕरेज मधून रायगव्हाण प्रकल्पात पाणी आणणे या कामाविषयी माहिती दिली बाजार समिती कारभार व त्याविषयी सूचना घेता येतील यासाठी सभा आयोजित करण्यात आली असून सभापती शिवाजी आप्पा कापसे यांनी संस्था माझ्या घर आहे समजून काम सुरू केला आहे. खर्चात काटकसर करीत असून कळंब मार्केट यार्ड बाजारपेठेची ओळख वाढावी यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत.
    सभापती शिवाजी कापसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शेतकरी मालक आहे. त्यांनी निवडून दिले आहे संस्थेचा कारभार कसा चालतो. त्यांना कळले पाहिजे खर्चात काटकसर करून जास्तीत जास्त विकास कामे करण्यात येत आहेत.शिराढोण येथे उप बाजार समितीचे एक महिन्याच्या आत सुरू होत आहे येथे रेशीम बाजारपेठ सुरू करण्यात येणार आहे, तसेच ईटकुर येथे जनावराचा बाजार यासाठी जागा व उपबाजार समिती सुरू करण्याविषयी कार्यवाही सुरू आहे,गरीब शेतकऱ्यांच्या मुला मुलींचे सामुदायिक लग्न आयोजित करण्यात येणार असून या साठी सामाजिक संस्था संघटना व्यापारी संस्था यांच्याकडून मदत व सहकार्य घेतले जाणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात संचालक भारत सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक भास्कर चंदनशिव तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल कांचनमला सांगवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.आभार उपसभापती प्रा.श्रीधर भवर यांनी आभार मानले. संचालक हनुमंत आव्हाड, कल्याण टेकाळे,विलास पाटील ,संदीप मडके, सुजाता वाघमारे, सुनिता शेळके ,हरिचंद्र कुंभार, भारत सागळे, अशोक टेळे ,रामकिशन कोकाटे, अरुण चौधरी ,लक्ष्मण कोल्हे, रोहन पारख, शिवाजी अडसूळ यांची उपस्थिती होती
    * विशेष सत्कार – कृषी ,व्यापारी, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील या मान्यवरांचा झाला सत्कार – बालाजी आडसुळ, मुस्तान मिर्झा , श्रीकांत भिसे, श्रीमंत पाडे ,कृष्णकांत शितोळे, विलास जगताप ,नामदेव पुदाले, बाळासाहेब पाटील, संतोष तौर,रवींद्र निगुट, अतुल मडके, बिभीषण कुंभार ,अमोल जाधव ,पोपट पवार, अमोल यादव, उमाकांत गिराम, बालाजी मडके, कैलास केसरे ,अनंत घोगरे ,अच्युतराव माने ,शितल ओव्हाळ, शितल शिंदे ,गंगासागर शिंदे अशोक काटे ,प्रा. सांगवे लिंबराज चोंदे , शाहूराव लांडगे ,अजय जाधव यांचा समावेश होता.
error: Content is protected !!