धाराशिव- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात सहाय्यक कुलसचिव भगवान फड यांचे माहिती अधिकार कायदा विषयावर व्यवस्थापन परिषद कक्षामध्ये व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ.प्रशांत दीक्षित यांनी भूषविले.कक्ष अधिकारी विद्याधर गुरव यांनी प्रास्ताविक केले. माहिती अधिकार कायद्याचे उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना सक्षम करणे, सरकारच्या कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवणे, भ्रष्टाचाराला आळा घालणे, लोकशाही व्यवस्था लोकांसाठी सकारात्मक व सुरक्षित कार्य करित आहे. माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती न दिल्यास माहिती आयोग दररोज 250 रूपये दंड करू शकतो. सर्व माहितीचे डिजिटलायझेशन करण्याची प्रक्रिया महत्वाची आहे, म्हणजे लोकांना वेळेत माहिती उपलब्ध होईल. माहिती अधिकाराविषयी विस्तृत व विश्लेषणात्मक माहिती त्यांनी दिली. यावेळी विद्यापीठ उपपरिसरातील सर्व विभागातील विभागप्रमुख,प्राध्यापक, कर्मचारी,उपस्थित होते. कक्ष अधिकारी विद्याधर गुरव यांनी आभार मानले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला