February 24, 2026

राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे अभिवादन

  • धाराशिव–स्वच्छता,शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजसेवेचा जाज्वल्य संदेश देणारे महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२३ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यामंदिर हायस्कूल आष्टा येथे अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    शिक्षण घ्या,गरिबांना मदत करा, प्राणीमात्रांवर दया करा आणि देव दगडात नसून माणसांत शोधा,हा त्यांचा मानवतावादी संदेश कृतीतून जगणाऱ्या संत गाडगे महाराजांना विद्यालयाच्या वतीने मानाचा मुजरा अर्पण करण्यात आला.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
    यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    याप्रसंगी विद्यार्थ्यांना संत गाडगे महाराजांच्या कार्याची माहिती देण्यात आली.शिक्षणाचा प्रसार, अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी-परंपरांचा विरोध, व्यसनमुक्तीचा संदेश, प्राणीहत्याविरोधी भूमिका आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.
    कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी स्वच्छता,समाजसेवा आणि मानवतेची मूल्ये आचरणात आणण्याचा संकल्प केला.संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले होते.
error: Content is protected !!