February 24, 2026

कर्नल एम.सी.अयप्पा यांची शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाला सदिच्छा भेट;एनसीसी कॅडेट्सना प्रेरणादायी मार्गदर्शन

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील एनसीसी विभागासाठी अभिमानास्पद असा क्षण नुकताच अनुभवायला मिळाला.National Cadet Corps (NCC) अंतर्गत कार्यरत असलेल्या ०७ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनला कमांडिंग ऑफिसर Colonel M.C.Ayappa यांनी सदिच्छा भेट देत विभागाच्या कामकाजाची पाहणी केली.
    या भेटीदरम्यान कर्नल अयप्पा यांनी एनसीसी कॅडेट्सशी संवाद साधत शिस्त,राष्ट्रनिष्ठा,
    आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण यांचे महत्त्व अधोरेखित केले. एनसीसीच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी उपलब्ध असलेल्या करिअरच्या विविध संधी,सैन्यदलातील प्रवेश प्रक्रिया तसेच व्यक्तिमत्त्व विकासातील एनसीसीची भूमिका याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी विद्यार्थिनींमध्ये उत्साह आणि देशसेवेची भावना अधिक दृढ झाली.

  • कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,
    उपप्राचार्य डॉ.कमलाकर जाधव व संचालक डॉ.संजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच 7 Maharashtra Girls Battalion NCC च्या लेफ्टनंट सरस्वती वायभसे,53 Maharashtra Battalion NCC चे लेफ्टनंट हरिभाऊ पावडे,ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर हवालदार मंगेश दहिभाते आणि पंकज शिंदे यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
    कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ अंडर ऑफिसर दृष्टी कोठावळे व कनिष्ठ अंडर ऑफिसर काजल सोनोने यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी एनसीसी कॅडेट्ससह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कर्नल अयप्पा यांच्या सदिच्छा भेटीमुळे महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाला नवी ऊर्जा मिळाली असून विद्यार्थिनींमध्ये राष्ट्रसेवेची प्रेरणा अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
error: Content is protected !!