February 24, 2026

ज्ञान प्रसार विद्यालयात संत गाडगे बाबांना अभिवादन

  • मोहा– ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.२३ फेब्रुवारी २०२६ रोजी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी पर्यवेक्षक सतीश कानगुडे,उच्च माध्यमिक विभागाचे प्रा.सुनील साबळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.याप्रसंगी भाग्यश्री सचिन कसबे, वसुंधरा प्रताप वीर,वैष्णवी रवींद्र वीर,
    अंजली राहुल मडके,सानिका संजय बाराखोते,प्रिया विनोद जाधव तसेच वैष्णवी बापूराव मडके
    या विद्यार्थ्यांनी गाडगेबाबांच्या जीवनाविषयी व त्यांच्या सामाजिक कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शेखर गिरी यांनी केले तर आभार प्रदर्शन सहशिक्षक ज्योतीराम सोनके यांनी केले.
error: Content is protected !!