February 24, 2026

कडकनाथ वाडीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

  • जय भवानी-जय शिवरायच्या घोषणांनी दुमदुमला परिसर
  • वाशी – तालुक्यातील कडकनाथ वाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
    संपूर्ण गावात देशभक्तीचा आणि शिवभक्तीचा जल्लोष पाहायला मिळाला.
    जयंतीनिमित्त सकाळी शिवप्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.त्यानंतर गावातील युवकांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत “जय भवानी,जय शिवराय”च्या घोषणांनी वातावरण भारावून टाकले.शिवचरित्रावर आधारित भाषणे,देशभक्तीपर गीते आणि मुलांचे सांस्कृतिक सादरीकरण यामुळे कार्यक्रमात रंगत आली.
    या प्रसंगी गावातील आजी-माजी सरपंच,उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून समाजकार्यात सक्रिय राहण्याचे आवाहन केले. शिवाजी महाराजांच्या शौर्य,धैर्य आणि न्यायनिष्ठ राज्यकारभाराचा आदर्श युवकांनी घ्यावा,असेही त्यांनी नमूद केले.
    कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सागर धालगडे, महेश आण्णा जगताप,शुभम मुळे,आदित्य जगताप,शिवराज जगताप,संदीप जगताप,शिवम पाटील,ओंकार पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
    कडकनाथ वाडीतील या शिवजयंती सोहळ्याने गावकऱ्यांमध्ये ऐक्य,उत्साह आणि शिवभक्तीची भावना अधिक दृढ झाली आहे.
error: Content is protected !!