February 22, 2026

‘सा.साक्षी पावनज्योत’चा विशेष अंक देऊन वाढदिवस साजरा

  • मोहा– ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथील सहशिक्षक जनार्धन भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि.२१ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने अभ्यासू व परखड व्यक्तिमत्व असलेले निर्भीड संपादक सुभाष घोडके यांच्या लेखणीतून साकारलेला ‘सा.साक्षी पावनज्योत’चा ‘शिवजन्मोत्सव–२०२६’ हा विशेषांक यावेळी जनार्धन भामरे यांना भेट देण्यात आला. विद्यालयाचे प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते विशेषांक प्रदान करून त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
    कार्यक्रमात शिक्षकांनी भामरे सरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच संस्कारमूल्ये जोपासण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा उल्लेख यावेळी करण्यात आला.
    याप्रसंगी सहशिक्षक सतिश मडके,एस.जे.सोनके,‘सा.साक्षी पावनज्योत’चे कार्यकारी संपादक अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमात उपस्थितांनी भामरे सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत राहो,अशी भावना व्यक्त केली.
error: Content is protected !!